रुको जरा सबर करो! काँग्रेसची फेक यादी व्हायरल
Solapur Vidhansabha Election Congress Umedwar Fake List
सोलापूर : विधानसभा निवडणुकीत कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकताच सर्वांमध्ये दिसून येत आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ आणि सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळेल याची सर्वच पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.
काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्याबाबतचे एक पत्र व्हाट्सअपवर व्हायरल झाले आहे. मात्र हे पत्र फेक असल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कळवले आहे. या फेक पत्रामध्ये शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून बाबा मिस्त्री यांना आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातून धर्मराज कडादी यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे म्हटले आहे.
अशा प्रकारचे फेक पत्र व्हायरल करून लोकांमध्ये आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असू शकतो.
मध्य मतदारसंघातून एका सच्चा काँग्रेस कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाईल असे खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटले होते. तिकडे दक्षिण विधानसभा मतदारसंघात दिलीप माने यांनी जोरदार तयारी केली आहे मात्र त्या ठिकाणी काँग्रेस कोणाला संधी देणार याची उत्सुकता आहे.
Praniti Shinde News
Praniti Shinde Congress Candidate
Dilip Mane News
Baba Mistri Congress