सोलापूर विकास मंचने रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचे वेधले लक्ष
सोलापूर विकास मंचने केली अतिशय अभ्यासपूर्ण मागण्या
सोलापूर : सोलापूर रेल्वे स्थानक आणि डिव्हिजनला स्वातंत्र्यकाळा अगोदर पासुन फार महत्व असुन गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे विषयी सोलापूरच्या प्रलंबित कामांवर सोलापूर विकास मंचच्या वतीने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांना अभ्यासपूर्ण निवेदन सादर करण्यात आले.
१) सोलापूरातील रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण तातडीने हटविण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेणे.
२) रेल्वेचे प्लॅटफॉर्म वाढवणे अत्यंत गरजेचे असुन जुन्या मालधक्का येथे नवीन प्लॅटफॉर्म करून सोलापूरहून सुटणाऱ्या गाड्या तेथूनच सोडण्यात याव्या.
३) सोलापूर स्टेशनच्या इंद्रधनु संकुल जवळ प्रवेशद्वार, तिकीटघर व पार्किंग ची सोय करून ईस्ट व वेस्ट असे दोन्ही कडून प्रवेश मिळाला पाहिजे जेणे करून महात्मा गांधी चौकातील वर्दळ कमी होईल.
४) कंबर तलावपासून स्टेशन पर्यंत एक रस्ता केल्यास व मीटर गेज रुळाच्या जागेवरील अतिक्रमण काढल्यास जुळे सोलापुरातील प्रवासी लवकर स्टेशन वर पोहचू शकतील.
५) ४ आणि ५ नंबर प्लॅटफॉर्म वर लिफ्ट व एस्क्लेटर होणे गरजेचे आहे.
६) होटगी स्टेशन पर्यंत येणारी हुबळी सिकंदराबाद ही गाडी सोलापूर पर्यंत आणावी जेणे करून हैद्राबाद जाणार्या प्रवाश्यांना आणखी एक गाडी मिळेल.
७) पुण्याच्या हुतात्मा एक्सप्रेस ला एक जनरल बोगी पहिला होती तशी पुन्हा जोडण्यात यावी.
८) तसेच हुतात्मा एक्सप्रेस ला ३ कोच हे काढून स्लीपर कोच बसवले हे कदापि योग्य नाही कारण दिवसाच्या प्रवासा दरम्यान कोणी झोपून जात नसतात मग स्लीपर कोच चे पैसे जास्त का द्यावे व पूर्ववत चेअर कोच लावावे.
९) वंदे भारत, हुतात्मा व सिद्धेश्वर ह्या तीनही गाड्या प्लॅटफॉर्म क्र १ वरूनच सुटल्या पाहिजे व पुन्हा एक नाबरवरच आल्या पाहिजे. ९) दौंड ते वाडी ह्या ट्रॅकवर सध्या ११० कीमी प्रमाणे गाड्या धावत आहे त्या ट्रॅक वर १३० कीमी धावण्याची परवानगी द्यावी त्या मुळे गाड्या लवकर सोलापूरला येऊ जाऊ शकतील.११) सोलापूर ते नागपूर,सोलापूर ते गोवा व पुणे सिकंदराबाद वंदे भारत लवकर सुरू करावी. ११) सोलापूर ते उस्मानाबाद नवीन ट्रॅक चे काम लवकर सुरू करावा. १२) सध्या सोलापूरला येणाऱ्या व जाणार्या सर्व गाड्या वेळेवर येत नाहीत त्या पूर्वी प्रमाणे वेळेवर याव्यात. सदर मागण्यांचे निवेदन मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर राम करण यादव यांना सोलापूर विकास मंचच्या वतीने देण्यात आले. यावेळी केतनभाई शहा, विजय कुंदन जाधव,अॅड.दत्तात्रय अंबुरे, श्रीनिवास गोयल, योगिन गुर्जर, मिलिंद भोसले, अॅड. प्रमोद शहा, सुहास भोसले, आनंद पाटील आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते.