शेतकऱ्याची मुलगी झाली पोलीस उपाधीक्षक

शेतकऱ्याची मुलगी झाली पोलीस उपाधीक्षक

surekha saudagar kamble from mohol Solapur becomes Dy SP

सोलापूर : राज्यसेवा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत जाण्याची क्रेझ जिल्ह्यातील तरुणाईमध्ये वाढल्याचे चित्र आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यसेवा परीक्षेच्या निकालात सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.

यामध्ये अधिकारी वर्ग १ पदी निवड होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने एमपीएससी परीक्षेत सोलापूरचा डंका वाजला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये मोहोळ तालुक्यातील देवडी येथील शेतकऱ्याची मुलगी कुमारी सुरेखा सौदागर कांबळे हिने यश संपादन केले आहे. एससी प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यातून महिलांमध्ये प्रथम क्रमांक आली आहे.
याच्या अगोदर सुरेखा कांबळे हिचे २०२० च्या राज्यसेवा परीक्षेमध्ये त्यांची नायब तहसीलदारपदी निवड करण्यात आली होती. ‌आता त्यांची आता शासनाने पोलीस उपाधीक्षक निवड करण्यात आली आहे.
--

माझ्या या यशात माझी वडील, आई, भाऊ बहिण व मैत्रिणींचे खूप मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळेच हे शक्य झाले आहे.
- सुरेखा कांबळे, 
एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थिनी