गुन्हे वृत्त

दहशत निर्माण केलेला वाळू तस्कर कुमार थेट येरवड्यात!

सोलापूर : संगोला येथील वाळु तस्कर कुमार मेटकरी याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार स्थानबध्दची कारवाई करण्यात आली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

वाळु तस्कर कुमार आनंद मेटकरी (वय २५ रा. मेटकरी वस्ती, सांगोला) यांच्या विरूध्द सोलापूर, सांगली जिल्ह्यात अवैधरित्या वाळू उपसा करणे, वाळू चोरी करणे, ट्रकमधुन वाळुची वाहतुक करणे, वाळुची विक्री करणे, दरोडा टाकणे, शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करणे, घातक हत्याराचा वापर करून इच्छापुर्वक दुखापत पोहोचवणे, शिवीगाळी दमदाटी करून जिवे ठार मारण्याची धमकी देणे असे १० गुन्हे दाखल आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning

मागील ०८ वर्षांपासून त्याने त्याची दहशत व भिती राहावी, त्यातून त्यास आर्थिक तसेच इतर फायदे मिळावे याकरीता गुन्हेगारी वर्तन करत होता. त्यास यापुर्वी सोलापूर जिल्हयातून २०२१ मध्ये हद्दपार करण्यात आले होते. तरी देखील कुमार मेटकरी याने पुन्हा पुन्हा गुन्हेगारी कारवाई करुन सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत व भिती निर्माण करुन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली होती.

वाळु तस्कर कुमार मेटकरी याच्या गुन्हेगारी कारवायांवर व सार्वजनिक सुव्यवस्थेस बधा आणणारी कृत्ये करण्यास भविष्यातही प्रतिबंध करणेसाठी शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्फतीने जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मा. श्री. कुमार आशिर्वाद, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सोलापूर यांनी M.P.D.A. कायदयान्व्ये स्थानबध्द करणेबाबत आदेश निर्गमित केल्याने कुमार मेटकरी यास दिनांक २५/०५/२०२४ रोजी येरवडा कारागृह, पुणे येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.

शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, यांच्या मार्गदर्शना खाली श्री. विक्रांत गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा, पोलीस निरीक्षक, सुरेश निंबाळकर, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक, बी. एस. खणदाळे, सहा. पो. नि. सचिन जगताप, ने. सांगोला पोलीस ठाणे, श्री. बालाजी बनसोडे, ना. तहसिलदार, विलास म्हेत्रे, गृह विभाग, जिल्हाधिकारी, कार्यालय स.पो. फौ. निलकंठ जाधवर, स.पो. फौ. कल्याण ढवणे, पो. ना. अनिस शेख, पो.कॉ. पैगंबर मुलाणी यांनी ही कामगिरी केली आहे.

Related Articles

Back to top button