पर्यावरण / पर्यटन

कासव आणि किल्ला पाहून सोलापूरकर खुश!

Eco Friendly Club Kokan Velas Turtle Festival Trip

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : निसर्ग पर्यटन वाढावे यासाठी कार्यरत असलेल्या इको फ्रेंडली क्लबच्या माध्यमातून सोलापूर येथील निसर्गप्रेमींनी कोकण भटकंती केली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, केशवराव मंदिर, वेळास, पाळंदे बीच आणि सुवर्णदुर्ग किल्ला येथे भटकंतीचे आयोजन करण्यात आले होते.

HTML img Tag Simply Easy Learning

21 मार्च रोजी सर्वजण होम मैदान येथून मार्गस्थ झाले.

22 मार्च रोजी सकाळी सर्वजण दापोली येथील हॉटेल कोकण इन आणि हॉटेल ब्लु डायमंड येथे पोचले.

फ्रेश झाल्यानंतर सर्वांनी चहा-नाश्ता केला. त्यानंतर बस प्रवास करत सर्वजण असूद येथील प्रसिद्ध श्री केशवराव मंदिर परिसरात पोचले.

नारळी सुपारीच्या बागेतून वाट काढत सर्वजण मंदिर परिसरात पोचले. अतिशय सुंदर आणि निसर्गसंपन्न परिसरात असलेल्या मंदिराला भेट देऊन सर्वजण आनंदून गेले.

पुन्हा सर्वजण बसपर्यंत पोचले. बस प्रवास करत सर्व निसर्गप्रेमी वेळास येथे पोचले. सर्वांनी अस्सल कोकणी पद्धतीच्या जेवणावर ताव मारला.

त्यानंतर वेळास येथील कासव महोत्सवाला सर्वांनी भेट दिली.

चिमुकले कासव पाहून सर्व निसर्गप्रेमींनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर वेळास बीचवर सर्वांनी सूर्यास्त अनुभवला.

पुन्हा बस प्रवास करत सर्वजण हॉटेलवर पोहोचले रात्रीचे जेवण करून सर्वांनी मस्तपैकी मुक्काम केला.

भटकंतीच्या दुसऱ्या दिवशी सर्व निसर्गप्रेमी फ्रेश होऊन चा नाश्ता करून दापोली परिसरातल्या पाळंदे बीचवर पोचले.

बीचवर वॉटर ऍक्टिव्हिटी एन्जॉय केली. समुद्राच्या पाण्यात सर्वांनी मनसोक्त एन्जॉय केला.

त्यानंतर दुपारचे जेवण करून सर्वजण बस प्रवास करत ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ला परिसरात पोहोचले.

बोटिंग करत सर्वजण सुवर्णदुर्ग किल्ल्यावर पोचले. ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ला सर्वांनी पाहिला आणि इतिहास जाणून घेतला.

पुन्हा बोटिंग करत सर्वजण बसपर्यंत आले त्यानंतर सर्वांचा परतीचा प्रवास सुरू झाला.

पुढील भटकंतीच्या अपडेटसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा…

प्रतापगड जवळील प्रतापगड कॉर्नर हॉटेल वर सर्वांनी रात्रीचे जेवण केले आणि सोमवारी सकाळी सर्व निसर्गप्रेमी सुरक्षितपणे सोलापूरला पोहोचले.

इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, समन्वय सटवाजी (अजित) कोकणे, संतोष तडवळ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या निसर्ग भ्रमंतीमध्ये सरस्वती कोकणे, सागर माने, महेश माने, रत्नप्रभा माने, स्मिता शिंदे, प्रणव शिंदे, आर्यन शिंदे, साईराज देशपांडे, वेद पेंढारकर, नील जेऊरकर, मकरंद काडगावकर, शुभदा काडगावकर, युक्ता जोशी, किशोरी शहा, अक्षया शहा, प्रियांका तांदळे, चिन्मयी तांदळे, जान्हवी तांदळे, स्मिता जाधव, वैष्णवी होलेपाटील, डॉ. सरला होलेपाटील, संजय टोळे, डॉ. योजना टोळे, रुपाली पाटील, जिजा पाटील, शार्दुल गावंडे, सर्वेश गावंडे, माधुरी ठाकरे, सौ राजश्री गायकवाड, नामदेव गायकवाड, प्रियांका जाधव, प्रयाण जाधव, ॲड. साधना काकडे, पद्मकांत घंटे, अश्विनी बोंदर, मृणाल बोंदर, गोविंद बोंदर, सुधीर गावडे, राजेंद्र जमादार, अर्चना जमादार, श्रेया डोईजोडे, अथर्व डोईजोडे, सुषमा डोईजोडे, मेघा क्षीरसागर, गंगुबाई कोकणे, आराध्या कोकणे, पूजा कोकणे, पल्लवी तडकळ, प्रांजली तडकळ, उमा चंदनशिवे, लक्ष्मी तुकाराम जाधव, अमृता नंदवते, राजश्री वनगुंडे, कौशल बागेवाडी, राजश्री सुतार, प्रिया वाघमारे, सीमा दत्तोसिंग पवार, हर्षलता पवार, मेदिनी कानसावी, शिल्पा तडवळ, अथर्व तडवळ, डॉ. शुभांगी कनकी आदी सदस्य सहभागी झाले होते.

ही निसर्ग भ्रमंती आनंददायी होण्यासाठी चडचणकर ट्रॅव्हल्सचे संचालक सोमनाथ चडचणकर, जगदीश चडचणकर, बस चालक समीर मस्के, रणजित डुकरे, सहाय्यक आतीश तांबे, विजय टूर्सचे चालक मोहन यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Back to top button