सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे काँग्रेसकडून उमेदवार असण्याची शक्यता आहे. स्वतः प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत.
सोलापूर लोकसभा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. कायम काँगेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ 2014 लोकसभेच्या मोदी लाटेपासून भाजपचा गड बनला आहे. आधी शरद बनसोडे आणि नंतर जयसिद्धेश्वर महास्वामी सोलापूर लोकसभेचे खासदार झाले. आता भाजपकडून नवीन उमेदवार कोण असेल याची उत्सुकता सर्वांना आहे.
सोलापूर मध्य विधानसभेच्या काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे या भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून आहे.
दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेजवरील प्रणिती शिंदे यांच्याविषयीची पोस्ट चर्चेत आहे.
वंचित बहुजन आघाडीची पोस्ट –
ताई, तुम्ही आणि तुमच्यासारखे लोक..
आम्ही सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी किंवा जनतेच्या पैशाने दक्षिण आफ्रिकेत वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी निवडणूक लढवत नाही.
आम्ही महाराष्ट्रातील वंचित – बहुजनांच्या आकांक्षा आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुका लढवतो.
असो, या सर्व गोष्टी बंद करा.
तुम्ही ठीक आहात? आम्हाला समजले आहे की, इतके दिवस थांबल्यानंतरही तुमचे तुमच्या पक्षासोबत जमत नाही.
नवीन पक्षाचा मुहूर्त कधी आहे?
यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. ‘ताई वडिलांमुळे आणि congress पक्षामुळे निवडून येताय. बाकी ताईच महाराष्ट्रासाठी योगदान काहीच नाही..’ ही कॉमेंट अकील गायकवाड यांनी केली आहे. ‘वडील पोलीस खात्यात.. नंतर मंत्री.. मुख्यमंत्री.. मग खासदार त्यानंतर मुलगी आमदार अन् कार्यकर्ते अजूनही आहेत तेथेच.. मेरा नंबर कब आयेगा याच विचारात आयुष्य काढत आहेत. अशी प्रतिक्रिया सचिन भोसले यांनी नोंदवली आहे.