‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे आंतरराष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर

‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे आंतरराष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर
श्रीकृष्ण चांडक, उत्तम कांबळे, विजय बाविस्कर, मृणालिनी नानिवडेकर, रवींद्र आंबेकर आणि विशाल पाटील पुरस्काराचे मानकरी
मुंबई (प्रतिनिधी) – ‘व्हॉईस ऑफ मीडिया’,‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने देण्यात येणारे ‘व्हॉईस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार २०२५’ जाहीर झाले आहेत. या वर्षी या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र राज्यातील सहा नामांकित पत्रकारांचा समावेश असून येत्या १५ व १६ नोव्हेंबर २०२५ रोजी पंढरपूर येथील इस्कॉनच्या ‘भुवैकुंठ प्रकल्पा’मध्ये होणाऱ्या राज्य शिखर अधिवेशनामध्ये मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये संघटनेचे संस्थापक, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष बालाजी फुगारे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. गेल्या पाच वर्षांपासून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’, ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ या संघटनेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार आणि संपादकांना त्यांच्या आयुष्यभराच्या उल्लेखनीय पत्रकारितेतील योगदानाबद्दल सन्मानित करण्याची परंपरा आहे.
यावर्षी या पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार,लेखक तसेच दैनिक महासागर माध्यम समूहाचे प्रमुख श्रीकृष्ण चांडक, ज्येष्ठ संपादक, लेखक आणि विचारवंत उत्तम कांबळे, लोकमत समूहाचे संपादक, विचारवंत विजय बाविस्कर, पुढारीच्या मल्टिमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर, ज्येष्ठ पत्रकार, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक प्रमुख रवींद्र आंबेकर आणि लोकशाही मराठी न्यूज चॅनलचे संपादक विशाल पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
पंढरपूर येथे पार पडणाऱ्या अधिवेशनामध्ये देशभरातील पत्रकार, संपादक, लेखक, विचारवंत तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून पत्रकारितेतील नव्या प्रवाहांवर विविध सत्रे आणि चर्चा देखील आयोजित करण्यात येणार आहेत.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’, ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’चे कार्याध्यक्ष संजय आवटे, सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला, दिव्या भोसले, कोषाध्यक्ष चेतन बंडेवार, संघटक अशोक वानखडे, अश्र्विनी डोके-सातव, परवेज खान, कार्यवाहक शंतनू डोईफोडे, संचालक संयोजक शिवाजी गावंडे, व्यंकटेश जोशी, गोरक्षनाथ मदने, किशोर कारंजेकर,आंतरराष्ट्रीय प्रमुख गगन महोत्रा,आरोग्य विंगचे प्रमुख भीमेश मुतुला यांनी सर्व पुरस्कार्थींना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.



