पर्यावरण दिनी ‘आयएमएस’मध्ये सीडबॉल बनवण्याचे प्रात्यक्षिक

पर्यावरण दिनी ‘आयएमएस’मध्ये सीडबॉल बनवण्याचे प्रात्यक्षिक

world environment day seed ball activity indian model school solapur

सोलापूर : पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आज 5 जून 2023 रोजी जुळे सोलापुरातील इंडियन मॉडेल स्कूलमध्ये इको फ्रेंडली क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांना सीड बॉल बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

आधी माती आणि शेणखत एकत्र केले. माती मळून झाल्यावर त्याचे गोळे बनवले. त्यात वेगवेगळ्या बिया घालून सीड बॉल बनवले. वाळलेले सीड बॉल सायकलिंग, निसर्ग भ्रमंती, ट्रेकींग आणि सहलीदरम्यान टाकायचे. हे सीड बॉल फुटून बियांना अंकुर येईल आणि त्या रोपांचे झाडात रुपांतर होईल, अशी ही संकल्पना असल्याचे वसुंधरा मित्र, इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे यांनी सांगितले.

इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, समन्वयक अजित कोकणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी इको फ्रेंडली क्लबचे सदस्य सोहम थेटे उपस्थित होते. इंडियन मॉडेल स्कूलचे प्रमुख अमोल जोशी, सायली जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका अपर्णा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबवण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापिका अपर्णा कुलकर्णी यांनी इको फ्रेंडली क्लबच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव यासह विविध उपक्रमांचे कौतुक केले.

#seedball #सिडबॉल #ecofriendlyclub #solapur #smartsolapurkar #environment #majhivasundhara #IPledge