चांगल्या फोटोसाठी कॅमेऱ्यासोबत लेन्स आणि सेन्स असणं गरजेच असतं!

चांगल्या फोटोसाठी कॅमेऱ्यासोबत लेन्स आणि सेन्स असणं गरजेच असतं!

जागतिक फोटोग्राफर दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा..

स्माईल प्लीज, स्माईल प्लीज.. या शब्दाचा सर्वाधिक सतत उपयोग करणारा व्यक्ती म्हणजे फोटोग्राफर. ऊन वारा पाऊस आता कोरोना यापैकी काहीही असो निरंतर प्रामाणिकपणे आपल्या कामा शी जिवापाड प्रेम करणारा व्यक्ती म्हणजे फोटोग्राफर आणि आज 19 ऑगस्ट जागतिक फोटोग्राफर दिन..

 

आपल्या देशातच नव्हे तर जागतिक फोटोग्राफर दिन जगभरात साजरा जातो .फोटोग्राफी करायला सर्वांनाच आवडते आज प्रत्येक व्यक्ती ही फोटोग्राफरच आहे असे म्हणायला हरकत नाही.कारण आज प्रत्येकाकडे स्वतःचा कॅमेरा आहे म्हणजेच आपला मोबाईल, पण म्हणतात ना नुसता कॅमेरा असून उपयोग नाही कॅमेरा सोबत "लेन्स" माणसाकडे योग्य "सेन्स" असणं गरजेचं असतं.काही दिवसापूर्वी फोटोशूट करताना ला आलेला अनुभव आपल्याला सांगावसं वाटतं भुसावळला लग्नाचा फोटो शूट करताना वधूचा फोटो शूट करताना अचानक पाऊस आला आणि काय मला मात्र प्रश्नचिन्ह पडला 200 मीटर आता आत कसं जायचं शेवटी मी ठरवलं नवरीला पावसात न भिजता कार्यालयात न्यायचं माझ्या जवळ असलेला लाईट छत्रीचा वापर केला आणि नवरीला न भिजता कार्यालयात घेऊन गेलो यात मात्र माझ्या कॅमेरा वर पावसाच्या पाण्याचे कित्येक थेंब पडले होते तेव्हा मात्र मनाला प्रश्नचिन्ह पडला आता काय कॅमेराचा खरं नाही शेवटी मी सावरलो न घाबरता कॅमेरा पुसला देवाच्या कृपेने कॅमेराला कुठलीच इजा झाली नव्हती.

म्हणतात ना जेव्हा तुम्ही कोणासाठी चांगलं काम करता तुमच्या सोबत सुद्धा आपोआप चांगलंच गोष्टी घडू लागतात हाच निसर्गाचा नियम आहे.माणसाचा रक्तगट कुठलाही असो रक्तात माणुसकी असली पाहिजे , "जगणं ठाऊक, असणाऱ्यांना वागणं कसा असावं" हा प्रश्न कधीच पडत नाही सांगण्या मागचा उद्देश इतकाच की आज माझ्यासारखे कीती फोटोग्राफर तुमच्या अवतीभवती असतात तुम्ही त्यांना योग्य ते सन्मान द्यायला हवं कारण तुमची प्रत्येक आठवण तुमचे आनंदाचे प्रत्येक क्षण आम्ही आमच्या कॅमेऱ्यात कैद करतो हा वरील फोटो माझा मित्र पांडुरंग मगरूमखाणे त्याने अचानक टिपला मला तिथे पाहणारे भरपूर व्यक्ती होते काहीजण हसत होते काही जण मोबाईल मध्ये शूट करत होते पण माझ्या मित्राला मी धन्यवाद देतो की तो मात्र माझ्यासोबत होता*, *एका फोटोग्राफर ला एक फोटोग्राफर समजू शकतो आणि तुम्ही सर्वे वाचणारे सुद्धा नक्कीच एक फोटोग्राफर आहात.
- फोटोग्राफर संदीप विजयकुमार सरवदे