बळीराजाला थांबून चालणार नाही! छत्रपती संभाजी महाराजांनी शेअर केलीय भावनिक पोस्ट

सोलापूर : खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी आज आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट शेतकरी राजाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी आहे. 

छत्रपती संभाजी महाराज म्हणतात, 'शेतकऱ्याच्या पायाला भेगा का पडतात? स्वतःच्या घामाने धरतीला भिजवून जगाला पोसणाऱ्या बळीराजाला किती कष्ट सोसावे लागतात? याचा अनुभव घेता आला. तिफणीला ओढताना एका फेरीतच माझा श्वास फुलून गेला, मला लगेच मास्क काढून ठेवावा लागला.(अंगमेहणीतीचे काम नसताना, इतरवेळी सर्वांनी मास्क वापरणे गरजेचे आहे.) कोरोना मुळे संपूर्ण जगाला थांबावं लागलं. पण बळीराजाला थांबून चालणार नाही, अन् तो थांबणारही नाही.'

मी स्वतःच्या शेतातून घरी येत  असताना, वाटेत एक संपूर्ण कुटुंब शेतात पेरणी करत असताना दिसले. गाडी पुढे गेली, पण मला ते दृश्य पाहून राहवलं नाही.  परत गाडी वळवली आणि त्यांच्याकडे गेलो.  सुरुवातीला संकोच वाटला की मी कसा जाऊ? त्यांना कसं विचारू? परंतु न कळत मी त्यांच्या रानात ओढला गेलो. हा अनुभव मला समृद्ध करून गेला. जगाच्या पोशिंद्या शेतकरी राजाचे संपूर्ण जगाने ऋण व्यक्त करत त्यांचा सन्मान केला पाहिजे, असेही महाराजानी म्हटले आहे.

या बातमीसोबत महाराजांनी शेअर केलेला व्हिडिओ जोडत आहोत. नक्की पाहा आणि बातमी शेअर करायला विसरु नका.