राजकीय

कासेगावातील महिला ग्रामसभेत महत्वाचा ठराव

सोलापूर : पुरुषांच्या उपस्थितीत सार्वजनिक ठिकाणी आयोजित केलेल्या ग्रामसभेत महिलांची संख्या नगण्य असते. पुरुषांसमोर बोलण्यास महिला संकोच करतात. त्यामुळे गावातील महिलांच्या अडी – अडचणी समजून घेण्यासाठी कासेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आज मंगळवार दि. 16 जानेवारी 2024 रोजी शंभू महादेव मंदिर येथे “महिला ग्रामसभे”चे आयोजन करण्यात आले होते.

HTML img Tag Simply Easy Learning

प्रथमत: सौ. साखरबाई रामा गायकवाड व विजया उद्धव जाधव यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्या सौ. अनिता हेडे यांनी उपस्थित महिलांचे स्वागत केले. आजच्या ग्रामसभेचे अध्यक्षस्थान सरपंच यशपाल( भैया) श्रीकांत वाडकर यांनी भूषविले. ग्रामसेवक श्री.बाळासाहेब चौगुले यांनी प्रास्ताविक करताना आजच्या विशेष महिला सभेचा उद्देश विशद केला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापका श्रीमती इंगळे मॅडम यांनी पाल्यांच्या शैक्षणिक प्रगती बाबत पालकांचे प्रबोधन केले. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आशा सेविका सौ. भाग्यश्री स्वामी यांनी आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती सांगितली व महिलांच्या आरोग्य विषयी जागृती केली. ग्रामसेवक श्री.बाळासाहेब चौगुले यांनी वार्षिक विकास आराखड्याचे वाचन केले.

HTML img Tag Simply Easy Learning

यानंतर उपस्थित महिलांनी त्यांच्या समस्या सभेपुढे मांडल्या. यामध्ये गावातील अवैध मद्य विक्रीमुळे कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, मानसिक समस्या गंभीर बनत चालल्याचे निदर्शनास आले. विषयाचे गांभीर लक्षात घेता ग्रामसभेमध्ये कासेगावातील अवैद्य मद्य विक्री बंद करण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. घरातील कर्त्या पुरुषांच्या व हाताशी आलेल्या तरुण मुलांच्या व्यसनाधीनतेमुळे होरपळलेल्या महिलांनी या ठरावाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला.

सार्वजनिक शौचालय, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी, विजेचा लपंडाव, घरकुल योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस नोंदणी इत्यादी विषयांवरती महिलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सरपंच श्री. यशपाल वाडकर व उपसरपंच श्री. ज्ञानेश्वर रोकडे यांनी समाधानकारक उत्तरे दिली. ग्रामपंचायत सदस्या सौ. सुरेखा चौगुले यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री.संभाजी चौगुले, श्री.शहाजान शेख, सौ. सोनाली वाडकर, सौ. कल्पना राऊत, सौ.सोनाली पाटोळे सौ. सुरेखा गायकवाड, बचत गट CRP सौ. तनुजा मुळे, सौ. स्वाती मिटकरी, सावित्री वेदपाठक, आशा सेविका सौ. सुनीता आदलिंगे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. मनीषा स्वामी तसेच श्री.राजकुमार वाडकर, श्री.जालिंदर गायकवाड, श्री.शिवाजी लोहार, श्री.राम चौगुले, श्री.रामहरी पाटोळे आदी उपस्थित होते.या विशेष ग्रामसभेला कासेगावातील सुमारे 300 हून अधिक महिलांची लक्षणीय उपस्थित लाभली.

#kasegaon
#ग्रामसभा

Related Articles

Back to top button