राजकीय

आमदार देवेंद्र कोठेंना उज्वल भविष्य!

MLA Devendra Kothe Meet Police Commissioner M Rajkumar

HTML img Tag Simply Easy Learning

आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतली पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांची भेट

HTML img Tag Simply Easy Learning

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखल्याबद्दल मानले आभार

सोलापूर : शहर मध्य विधानसभेचे आमदार देवेंद्र कोठे यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांची पोलीस आयुक्तालयात भेट घेतली. विधानसभा निवडणुकीदरम्यान पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पोलीस प्रशासनाने उत्तम कामगिरी करत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखल्याबद्दल आमदार श्री. कोठे यांनी पोलीस आयुक्तांचे आभार मानले. आमदार देवेंद्र कोठे‌ यांना उज्वल भविष्य असल्याचे मत पोलीस आयुक्तांनी यावेळी व्यक्त केले.


यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनीही आमदार देवेंद्र कोठे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी माजी नगरसेवक विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक मेघनाथ येमूल, माजी नगरसेवक गुरूशांत धुत्तरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, निवडणुककाळात शहर मध्य विधानसभा मतदारसंघात सर्वच विशेषत: संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलीस प्रशासनाने अत्यंत चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. निवडणुकीच्या निकालानंतरही शहरात शांतता कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी चांगले नियोजन केल्याचेही आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले.

पोलीस आयुक्त एम. राज कुमार म्हणाले, आमदार देवेंद्र कोठे यांची कार्यपद्धती सर्वसमावेशक आहे. शहराच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान असेल असा विश्वास आहे. नगरसेवक पदापासून आजवरची कामगिरी पाहता आमदार देवेंद्र कोठे यांचे भविष्य उज्वल आहे, असे कौतुकास्पद उदगारही पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी काढले.

Related Articles

Back to top button