सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन
---Advertisement---

अजून स्वप्नं शिल्लक आहेत! डॉ. नितीन ढेपे यांचा 50 वा वाढदिवस

On: February 26, 2024 3:23 PM
Follow Us:
---Advertisement---

Dr Niteen Dhepe Interview 50th Birthday Celebration News

सोलापूर : प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. नितीन ढेपे यांचा 50 वा वाढदिवस हॉटेल बालाजी सरोवर येथे उत्साहात साजरा झाला. कुटुंबीय आणि मित्र परिवारातील महिला सदस्यांनी औक्षण करून डॉ. ढेपे यांना शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ. ढेपे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला.

आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयराज शिंदे, सोलापूरचे माजी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेड प्रमुख यतीन शहा, सुहासिनी शहा, आई शकुंतला ढेपे, पत्नी डॉ. योगिता ढेपे, उद्योजक शरद ठाकरे, स्पेनका उद्योग समूहाचे सुहास आदमाने, ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी, प्रशांत माने, स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाचे संपादक परशुराम कोकणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ. ढेपे यांना शुभेच्छा दिल्या.

आई शकुंतला ढेपे, पत्नी डॉ. योगिता ढेपे यांच्यासह कुटुंबीय आणि मित्र परिवारातील महिला सदस्यांनी 50 व्या वाढदिवसानिमित्त डॉ. नितीन ढेपे यांचे 50 दिव्यांनी औक्षण केले.

Full Interview –

निवेदिका वसुंधरा काशीकर आणि माधव देशपांडे यांनी डॉ. नितीन ढेपे आणि डॉ. योगिता ढेपे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये डॉ. ढेपे यांनी आपल्या आयुष्याच्या वाटचालीतील महत्त्वाच्या घटनांना स्पर्श केला. अजून स्वप्नं शिल्लक आहेत.. आणखी आयुष्यात खूप काही करायचे आहे.. असे डॉ. ढेपे यांनी यानिमित्ताने सांगितले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. योगिता ढेपे, गायत्री आरके शास्त्री, राजकुमार शास्त्री, डॉ. ऋतुराज ढेपे, ऋषिकेश ढेपे यांच्यासह ढेपे परिवारातील सदस्य, स्किन सिटी परिवारातील स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

Photos : Raj Pawar

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment