सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन

सोलापुरात संतापजनक घटना!

On: July 14, 2026 12:27 PM
Follow Us:
HTML img Tag Simply Easy Learning

वृद्ध आई-वडिलांना बेघर करणाऱ्या
दोन मुलांसह सुनांवर गुन्हा

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर (स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडिया) : वाढत्या वयात ज्या मुलांनी आणि सुनांनी वृद्ध आई-वडिलांचा आधार बनायला हवे होते, त्यांनीच छळ करून घराबाहेर काढल्याची संतापजनक घटना सोलापुरात समोर आली आहे. याप्रकरणी दोन मुले आणि दोन सुनांच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींपैकी एक महिला वकील असल्याची माहिती समोर आली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

६८ वर्षीय वृद्ध मातेची पोलिसांत तक्रार

मुरारजी पेठ, सोलापूर येथील जुनी मिल चाळ परिसरात राहणाऱ्या ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक नंदा रमेश शिंदे यांनी या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी स्वतःच्या मुलांनी आणि सुनांनी केलेल्या छळाची सविस्तर माहिती पोलिसांना दिली.

२०१५ पासून छळ अन् जेवणाचीही आबाळ

गुन्ह्याच्या नोंदीनुसार, दोन्ही मुले आणि सुनांनी सन २०१५ पासून फिर्यादी नंदा शिंदे आणि त्यांच्या पतीचा सांभाळ करणे पूर्णपणे बंद केले होते. वृद्ध आई-वडिलांच्या राहण्याची, जेवणाची अथवा आरोग्याची कोणतीही व्यवस्था न करता, त्यांचा गेल्या ११ वर्षांपासून छळ केला जात होता.

स्वतःच्याच घरातून हाकलले, आरोपींमध्ये महिला वकील

आरोपींनी वृद्ध आई-वडिलांच्या नावावर असलेल्या घराचा स्वतः बेकायदेशीरपणे उपभोग घेतला आणि त्यांना वारंवार शिवीगाळ करून घराबाहेर काढले. नुकतेच १० जुलै २०२६ रोजी फिर्यादी वृद्ध माता स्वतःच्या घरी गेल्या असता, आरोपींनी त्यांना पुन्हा घरातून हाकलून दिले. धक्कादायक बाब म्हणजे, कायद्याचे ज्ञान असूनही वृद्ध सासू-सासऱ्यांचा छळ करणाऱ्या संशयित आरोपी सुनांपैकी एक महिला वकील आहे.

मुले आणि सुनांवर गुन्हे दाखल

वृद्ध महिलेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी त्यांचे दोन मुले १) अतुल रमेश शिंदे, २) अनुप रमेश शिंदे आणि दोन सुना ३) सुवर्णा अतुल शिंदे, ४) दिपाली अनुप शिंदे यांच्या विरुद्ध ‘ज्येष्ठ नागरिक, पालनपोषण व त्यांची देखभाल अधिनियम २००७’ च्या कलम २४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस प्रशासनाचे ज्येष्ठ नागरिकांना आवाहन

या घटनेच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांना आवाहन केले आहे की, पालकांचा छळ करणे, त्यांना मानसिक अथवा शारीरिक त्रास देणे आणि पालनपोषण न करणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारचा त्रास होत असल्यास ज्येष्ठ नागरिकांनी न घाबरता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कामगिरी करणारे पोलीस पथक

ही कारवाई सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त प्रितम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील, पोलीस हवालदार रूपनूर, पोलीस कॉन्स्टेबल कुंभार आणि पोलीस कॉन्स्टेबल बोराडे यांच्या पथकाने केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe Youtube Channel

Join Now