सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन
---Advertisement---

सोलापुरात टाटा आयपीएल फॅन पार्क

On: March 20, 2024 2:50 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : २२ मार्च पासून यंदाचा आयपीएल मौसम सुरु होत आहे. टाटा आयपीएल फॅन पार्कचे आयोजन सलग सहा वर्ष बीसीसीआयच्या माध्यमातून सोलापुर जिल्हा क्रिकेट संघटना करीत आहे.

देशात विविध भागात आयपीएल फॅन पार्कचे चे आयोजन करण्यात येते. आपल्या सोलापूरात येत्या २३ आणि २४ मार्चला विजापूर रोडवरील नेहरू नगर येथील मैदानावर दुपारी दीड वाजल्या पासून आपल्याला या सामन्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे.

पहिल्या दिवशी पहीला सामना पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपीटल आणि दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनराइजर्स हैद्राबाद हे दोन सामने. दुसऱ्या दिवशी दोन सामने पहीला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंटस् आणि दुसरा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स. हे सर्व सामने 18×36 फूट अशा मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.

प्रत्येक जण सामना पाहण्यासाठी तिकीट काढून याचा लाभ घेवू शकत नाही, म्हणून यामुळे नेमके स्टेडीयम मध्ये जे वातावरण असते तोच अनभुव येथे अनुभवायला मिळणार आहे आणि तेही विनामुल्य. याशिवाय येथे खाण्यासाठी खाद्य पदार्थ, शीतपेय, पाण्याची व्यवस्था आदी करण्यात आली आहे. पार्किंग व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे.

सर्व क्रीडाप्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेमार्फत करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now