राजकीय

ठरलं.. लोकसभेला प्रणितीताईच उमेदवार!

Solapur Loksabha Congress Candidate Praniti Shinde

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांना काँग्रेस पक्षाच्यावतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

गेल्या आठवड्यामध्ये निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आणि भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार कोण असणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे.

भारतीय जनता पार्टीकडून वेगवेगळ्या नावांची चर्चा होत आहे. अद्याप भारतीय जनता पार्टीने आपला उमेदवार जाहीर केला नाही. काँग्रेसकडून विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळेल असे सांगितले जात होते. आज अखेर यावर शिक्कामोर्तब झाले. आज सायंकाळी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून प्रणिती शिंदे यांच्या नावाचा उल्लेख आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने सोलापूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंद पसरला आहे. जनवात्सल्य कार्यालय सात रस्ता सोलापूर येथे आमदार प्रणिती शिंदे यांचे अभिनंदन करून कार्यकर्त्यांनी आतिषबाजी केली. आनंद साजरा केला.
यावेळी चेतन नरोटे, मनोज यलगुलवार, विनोद भोसले, गणेश डोंगरे, तिरुपती परकीपंडला, अमोल भोसले, दीनानाथ शेळके, रुपेश गायकवाड, शाहू सलगर, श्रीकांत गायकवाड यांच्यासह इतर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button