मनोरंजन

सोलापूरच्या ‘स्वरदा’चा आवाज ‘सन मराठी’ वर!

swarada moholkar voice on sony marathi sakha maza pandurang

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : दि. १० मार्चपासून सायंकाळी ७. ३० सुरु होणाऱ्या सन मराठी या वाहिनीवर सखा माझा पांडुरंग या मालिकेत सोलापूरची युवा गायिका स्वरदा मोहोळकर ही गाणार आहे. काही अभंग आणि ओव्या तिच्या आवाजात ऐकायला मिळणार आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning

स्वरादाला लहानपणापासून गायनाची आवड आहे. घरात संगीताचे वातावरण असल्याने गायनाचे संस्कार होत गेले. स्वरादाचे बाबा उमेश मोहोळकर हे उत्कृष्ट तबला वादक आहेत. सोलापुरातील नामवंत वाद्यवृंद शिवरंजनीचे ते संस्थापक सदस्य आहेत तर आई सौ. स्वरांगी मोहोळकर या बी. एस. कुलकर्णी प्रशालेत संगीत शिक्षिका आहे. तिने नुकतीच १२वी ची परीक्षा दिली. तिचे शास्त्रीय गायनाचे शिक्षण सौ. शर्वरी झंकार कुलकर्णी यांच्या कडे विशारद पूर्ण चे शिक्षण चालू आहे. या वाहिनीवर गाण्याची संधी पंढरपूरचे गायक, संगीतकार, साउंड रेकॉर्डिंस्ट विनोद शेंडगे यांनी उपलब्ध करून दिली. स्वरादाला आत्तापर्यन्त शहर स्तरावर, जिल्हास्तरावर आणि तसेच राज्यस्तरावर पारितोषिके मिळालेली आहे. तरी सर्व सोलापूरकरांनी ही मालिका सन मराठी या वाहिनीवर सोमवार दि. १० मार्च पासून सायंकाळी ७:३० वा सखा माझा पांडुरंग संत सखू वरील मालिका आवर्जून पाहावी आणि स्वरादास पुढील वाटचालीस शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button