सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन
---Advertisement---

बनवाबनवी करणाऱ्या बाबुला शिक्षा!

On: April 12, 2025 4:17 PM
Follow Us:
---Advertisement---
HTML img Tag Simply Easy Learning

Solapur Crime Branch Babu Shaikh Alfajz Shaikh Court News

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : जिल्हाधिकारी साहेबांच्या गाडीचा ड्रायव्हर असल्याची बतावणी करुन, सोलापूर येथील सोनारास गंडविणाऱ्या आरोपीस ०२ वर्षे ०६ महिने कारावासाची व ५००० रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

ऑगस्ट २०२३ मध्ये, निहाल ज्वेलर्स, जुना विजापूर नाका, विजापूर रोड, सोलापूर या दुकानाचे मालकास एका इसमाने स्वतःची ओळख, तो कलेक्टर साहेबांच्या गाडीचा ड्रायव्हर असल्याचे सांगितली. तसेच कलेक्टर साहेब मिटींगसाठी आलेल्या लोकांना सोन्याच्या अंगठ्या व लॉकेट गिफ्ट देणार आहेत असे सांगुन, निहाल ज्वेलर्सचे मालकास, कलेक्टर ऑफीस येथे अंगठयाचे माप घेण्यासाठी घेवुन गेला. तसेच, कलेक्टर ऑफिस येथे, निहाल ज्वेलर्सचे मालकास बाहेरच थांबवुन, तेथील लोकांशी त्याची ओळख आहे असा बनाव आणुन, एकूण ०८ सोन्याच्या अंगठया ३७.६३ ग्रॅम वजनाच्या व ०३ सोन्याचे लॉकेट २९.४८ ग्रॅम वजनाचे असे एकूण ६७.११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बनविण्यास कलेक्टर साहेबांनी सांगितले आहे असे सांगितले. तसेच सदरचे दागिने बनवुन परत कलेक्टर ऑफीस येथील पी.ए.च्या रुम येथे घेवुन जावुन, फिर्यादीस बाहेर थांबवुन, आतमध्ये जावुन कलेक्टर साहेबांच्या पी.ए. पासुन फिर्यादीस हात करुन, तसेच पी.ए.ला सुध्दा फिर्यादीस हात करावयास लावुन वरीलप्रमाणे ६७.११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेतले. तसेच सदरच्या अंगठ्या घेवुन परत पी.ए.च्या रुममध्ये गेला. तेथे काहीवेळ थांबुन तो बाहेर आला व निहाल ज्वेलर्सचे मालकास तुम्हाला कॉफी आणतो असे सांगुन तेथून बाहेर निघुन गेला. थोडा वेळ वाट पाहुन तो परत आला नाही म्हणुन, कलेक्टर साहेबांचे पी.ए. यास त्याच्याबाबत विचारणा केली असता, पी.ए. यांनी तो कलेक्टर साहेबांचा ड्रायव्हर नाही व ते त्यास ओळखत सुध्दा नाहीत असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने सदर इसमास आजुबाजुच्या परिसरामध्ये त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. यावरुन सदर इसमाने तो कलेक्टर साहेबांचा ड्रायव्हर असल्याचे खोटे सांगुन निहाल ज्वेलर्सचे मालकाकडुन सुमारे ६७.११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेवुन गेला असल्याने, त्याबाबत, निहाल ज्वेलर्सचे मालकाने दिलेल्या फिर्यादीवरुन, विजापूर नाका पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४६०/२०२३ भादंवि कलम ४२०, ४१९, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे साो यांनी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सदर इसमाचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने, गुन्हे शाखेचे सपोनि विजय पाटील, पोउपनि अल्फाज शेख व पथकातील पोलीस अंमलदार पोह/१२६९ राहुल तोगे, पोशि/१४७९ आबाजी सावळे, पोशि/१५२८ विठ्ठल यलमार, पोशि/३१६ अजिंक्य माने, पोशि/४०९ धिरज सातपुते असे मिळुन सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेवुन, त्या आरोपीस निष्पन्न केले होते. सदरचा गुन्हा मा. वरिष्ठांच्या आदेशान्वये, गुन्हे शाखेकडील पोउपनि अल्फाज शेख यांच्याकडे वर्ग झाल्यानंतर, गोपनिय बातमीदाराचे मार्फतीने प्राप्त झालेल्या माहितीवरुन या गुन्हयातील आरोपी नामे शेख बाबु शेख छोटुमिया, वय ४० वर्षे, रा. रशिद टेकडी नई आबादी, भोकर, जि. नांदेड यास ताब्यात घेवुन, पोउपनि अल्फाज शेख यांनी त्याच्याकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर आरोपीकडून गुन्हयात चोरी केलेले ६७.११ ग्रॅम सोन्याचे दागिने पंचनाम्याद्वारे, पोउपनि अल्फाज शेख यांनी जप्त करुन पुढील कारवाईकरीता, सदर आरोपीस तपास अधिकारी सपोनि देशमुख, नेम. विजापूर नाका पोलीस ठाणे, सोलापूर शहर यांच्या ताब्यात दिले. सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन, त्याने यापुर्वी अशाच प्रकारचे अनेक गुन्हे केल्याचे तपासामध्ये दिसुन आले आहे.

सी.आर.पी.सी. कलम २४८ (२) अन्वये दोषी ठरवुन त्यास ०२ वर्षे ०६ महिने सश्रम कारावासाची आणि रु. ५,०००/- इतक्या द्रव्य दंडाची आणि द्रव्यदंड न भरल्यास पुढील १ महिना साध्या कारावसाची शिक्षा व भादंवि कलम ४१९ मध्ये सी.आर.पी.सी. कलम २४८ (२) अन्वये दोषी ठरवुन ०१ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा दिली आहे. सदर खटल्यात सरकारी पक्षातर्फे ए.पी.पी. श्रीमती मांजरे मॅडम यांनी काम पाहिले आहे.

याप्रमाणे आरोपी नामे शेख बाबु शेख छोटुमिया यास मा. न्यायालयाने सदर गुन्हयामध्ये दोषी धरुन त्यास एकूण ०२ वर्षे, ०६ महिने सश्रम कारावासाची आणि रु. ५०००/- इतक्या द्रव्य दंडाची आणि द्रव्यदंड न भरल्यास पुढील १ महिना साध्या कारावसाची शिक्षा दिली आहे.

सदर गुन्हयाचा प्राथमिक तपास पोउपनि अल्फाज शेख, गुन्हे शाखा, सोलापूर शहर यांनी केला असुन, गुन्ह्याचे दोषारोपपत्र हे, सपोनि देशमुख, विजापूर नाका पोलीस ठाणे, सोलापूर शहर यांनी दाखल केले. सदरची कामगिरी, मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. राजन माने, सहा. पोलीस आयुक्त, श्री. सुनिल दोरगे, व.पो.नि., गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि देशमुख, पोउपनि अल्फाज शेख, पोलीस अंमलदार विठ्ठल यलमार, विजापूर नाका पोलीस ठाणेकडील कोर्ट पैरवी मपोना/काटकर, पोशि/जाधव यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe Youtube Channel

Join Now