ncp leader Anand Chandanshive news
सोलापूर : महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद चंदनशिवे 24 तासात पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.
आनंद चंदनशिवे म्हणतात, ‘पराभवातून खचनारा मी नाही, पुन्हा नव्याने त्याच जोमात, उत्साहात आपल्या लोकांच्या सेवेत रुजू झालो आहे. राजकारणात जय-पराजय होत असतो पण त्याचं तेवढं भांडवल न करता आपल्या जीवाभावाच्या माणसात उभे राहून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करत राहीन.
View this post on Instagram
आज प्रभागातील पाण्याची समस्या व नेहमीचे वेळापत्रक जाणून घेऊन नागरिकांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर विश्वास ठेवून जो मतरुपी आशीर्वाद दिलात त्याबद्दल सर्व जनतेचे पुनश्च धन्यवाद’
View this post on Instagram
तीन टर्म नगरसेवक राहिलेले आनंद चंदनशिवे यंदाच्या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. भारतीय जनता पार्टीचे समाधान आवळे यांना 8070 मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून निवडणूक लढवत असलेले आनंद चंदनशिवे यांना 4839 मते मिळाली आहेत.
निवडणुकीच्या निकालानंतर 24 तास होण्याच्या आत आनंद चंदनशिवे नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाल्याचे दिसून आले आहे. आज सकाळपासून वेगवेगळ्या नागरिकांची भेटून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यातून आनंद चंदनशिवे यांची खेळाडू वृत्ती दिसून येते.
View this post on Instagram









