सोलापूर (स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडिया) : होटगी रोड महिला हॉस्पिटल सोलापूर ते जेऊर रस्ता मजबुतीकरणाच्या कामामुळे आसरा चौकात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर, सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये आसरा रेल्वे ब्रिज ते आसरा चौक या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
हा आदेश दिनांक 2 जुलै 2026 रोजी मध्यरात्रीपासून ते रस्त्याचे काम संपेपर्यंत लागू राहणार आहे. या काळात वाहनधारकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
🚫 बंद करण्यात येणारा मुख्य मार्ग –
आसरा रेल्वे ब्रिज ते आसरा चौक (सर्व प्रकारच्या वाहनांसाठी येण्या-जाण्यास पूर्णपणे बंद)
🛣️ वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग –
१) जुळे सोलापूरकडून विमानतळाकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी –
आसरा रेल्वे ब्रिज ➡️ दत्त मंदिर ➡️ बँक ऑफ महाराष्ट्र कॉलनी ➡️ मजरेवाडी रेल्वे अंडरब्रिज ➡️ चौगुले पार्क युनायटेड ग्रीन ➡️ सहारा नगर क्रॉस रोड ते पुढे इच्छित स्थळी
२) जुळे सोलापूरकडून होटगी रोडकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी –
वैष्णवी प्लाझा ➡️ गोविंदश्री मंगल कार्यालय ➡️ भारती विद्यापीठ ➡️ विजापूर रोड, संत रोहिदास चौक ते पुढे इच्छित स्थळी.
३) नई जिंदगीकडून जुळे सोलापूरकडे जाण्यासाठी (पर्याय १) –
आसरा चौक ➡️ चव्हाण शोरूम ➡️ महिला हॉस्पिटल ➡️ महावीर चौक ते पुढे इच्छित स्थळी.
४) नई जिंदगीकडून जुळे सोलापूरकडे जाण्यासाठी (पर्याय २) –
आसरा चौक ➡️ सहारा नगर क्रॉस रोड ➡️ चौगुले पार्क युनायटेड ग्रीन ➡️ मजरेवाडी रेल्वे अंडरब्रिज, गिरीजा मंगल कार्यालय ते पुढे इच्छित स्थळी.
⚠️ महत्त्वाची सूचना –
पोलीस आयुक्तांच्या या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कायद्याप्रमाणे कडक कायदेशीर कारवाई (शिक्षेस पात्र) करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. वाहनधारकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिसांचा आदेश –







