“साहिराना शायरी” कार्यक्रम उद्या सोलापुरात
संगीत आणि शायरी प्रेमींसाठी मेजवानी
सोलापूर : Mh13 सोलापूर बे या पेजच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्ताने प्रसिद्ध साहित्यिक साहिर लुधियानवी यांच्या स्मरणार्थ “साहिराना शायरी” हा विशेष कार्यक्रम प्रभावतर्फे आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात साहिर लुधियानवी यांच्या अविस्मरणीय रचनांचा समावेश असून, त्यांच्या गाण्यांनी आणि शायरांनी रसिकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या क्षणांचा अनुभव सोलापूरच्या रसिकांना मिळणार आहे. Mh13 सोलापूर बे आणि प्रभाव चे संस्थापक धनराज बगले आणि त्यांची कलाकार टीम सातत्याने सोलापूरच्या रसिकांसाठी कार्यक्रम आयोजित करत असतात.
साहिर लुधियानवी, ज्यांना हिंदी सिनेमातील सर्वोत्कृष्ट गीतकारांपैकी एक मानले जाते, यांनी आपल्या लेखणीने अनेक अविस्मरणीय गाणी दिली आहेत. त्यांच्या काही प्रसिद्ध गीतांमध्ये “कभी-कभी मेरे दिल में ख्याल आता है,” “मैं जिंदगी का साथ निभाता चला,” “अभी न जाओ छोड़कर,” आणि “ये देश है वीर जवानों का” यांचा समावेश आहे. त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गीतांनी असंख्य लोकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे.परंतु हे महान व्यक्तित्व काळाच्या पडद्याआड जाऊ नये आणि नव्या पिढीला या शब्दाचा जादूगाराची ओळख व्हावी ह्या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
या आयोजित कार्यक्रमाला अपेक्षित उंचीवर नेहण्या करिता महिनाभरापासून संपुर्ण टीम सराव करत आहे. या कार्यक्रमासाठी सोलापुरातील कलाकार युवक जैद हसन हा गेल्या सहा महिन्यापासून साहिर लुधियानावी यांच्या जीवनप्रवासाचा अभ्यास करुन त्यांच्या संदर्भातील अनेक पुस्तके वाचून त्याने या कार्यक्रमाची रूपरेखा आखलेली आहे , आणि यासाठी त्याला सोलापुरातील उर्दू घर व राजाबागवान सरांचे मार्गदर्शन त्याला लाभले आहे.
“साहिराना शायरी” हा कार्यक्रम सोमवारी, ८ जुलै २०२४ रोजी, सायंकाळी ६.३० वाजता, हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असेल.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दिलीप माने, बशीर परवाज, दादा साळुंखे, सदाशिव पडदुणे (उपाध्यक्ष, सोलापूर उर्दू घर सांस्कृतिक समिती व उपविभागीय दंडाधिकारी जिल्हा परिषद, सोलापूर) इत्यादी सर्व मंडळींची उपस्थित असणार आहेत.
कार्यक्रमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी राजा बागबान यांच्याकडे असून लेखक जैद हसन आहेत. सोलापुरातील गझल कलाकार अतुल बेले, रसिका तुळजापूरकर, तबला वादक भरतेश तळवळकर, सिंथेसाईजर वादक अविनाश इनामदार, वायलिन आणि सितार वादक केदार गुळवणी, तालवादक नागेश भोसेकर, संगीत संयोजन साहिर नदाफ, आणि पार्श्वसंगीत अनुद सरदेशमुख या कलाकारांनी कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. नेपथ्य आणि प्रकाश योजना आकाश गोरे करणार आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी जिंजर कॅट चे रविराज आर्या, वैभव भोसले , अजय मधली, तपन मंगलपल्ली , साहिर नदाफ ममता बोल्ली यांचे सहकार्य लाभले आहेत
Mh13 सोलापूर बे च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त सोलापुरातील लोकांना या भव्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विनंती केली जातेय. जुन्या बहारदार गाण्यांचा आणि साहिर लुधियानवी यांच्या लेखणी चा आस्वाद घेण्यासाठी या समृद्ध असलेल्या या संध्याकाळी सोलापूरांनी सहपरिवार सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे विनम्र आवाहन प्रभाव टीम यांच्या कडून करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे तपशील :
कार्यक्रमाचे नाव – ” साहिराना शायरी ”
कार्यक्रमाची तारीख- सोमवारी, ८ जुलै २०२४ रोजी .
कार्यक्रमाची वेळ – सायंकाळी ६.३० वाजता .
कार्यक्रमाचे स्थळ – हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर .