राजकीय

‘शहर मध्य’मध्ये देवेंद्र कोठे ॲक्टिव्ह!

Solapur Central Vidhan Sabha Devendra Kothe BJP News

HTML img Tag Simply Easy Learning

परशुराम कोकणे
सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकत्व स्वीकारलेले सोलापुरातील युवा नेते देवेंद्र कोठे शहर मध्य विधानसभा मतदारसंघात ॲक्टिव्ह झाले आहेत. कोठे यांनी भारतीय जनता पार्टीच्या जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांसोबत संपर्क वाढवला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवेंद्र कोठे यांच्याकडून सुरू असलेल्या वह्या वाटप उपक्रमाचीही सगळीकडे चर्चा आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये देवेंद्र कोठे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी फडणवीस यांनी देवेंद्र कोठे यांचे पालकत्व स्वीकारत असल्याचे सांगितले होते. युवा नेते देवेंद्र कोठे हे शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच देवेंद्र कोठे यांचा थेट देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संपर्क असल्याची चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र कोठे शहर मध्य विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रम राबवत आहेत. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सरचिटणीस विशाल गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी देवेंद्र कोठे यांच्यासोबत दिसत आहेत. वह्या वाटप उपक्रमांसोबतच मतदार नोंदणी व दुरुस्ती आधार नोंदणी व दुरुस्ती, आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी, रेशन कार्ड नोंदणी व दुरुस्ती तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासह इतर योजनांची माहिती आणि लाभ दिला जात आहे.

Video : .. म्हणून मी भाजपात आलो!

सोलापूर उत्तर आणि सोलापूर दक्षिण या मतदारसंघांमध्ये सध्या भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत मात्र आजवर भारतीय जनता पार्टीकडून शहर मध्य मतदारसंघांकडे दुर्लक्ष झाले होते. देवेंद्र कोठे यांच्या रूपाने मध्य विधानसभा मतदारसंघातील विविध प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टीचे काम आणि सरकारी योजनांचा लाभ पोहोचत असल्याचे दिसून येत आहे.

Devendra Kothe BJP Solapur News

Devendra Fadnavis Solapur News

Devendra Kothe Solapur Central BJP candidate

Related Articles

Back to top button