पोलीस

पर्यावरणपूरक आणि एक गाव एक गणपतीला प्रोत्साहन

Solapur Gramin Police Ganeshotsav Meeting News

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : श्री. गणेशोत्सव दि. ०७/०९/२०२४ ते दि. १७/०९/२०२४ या कालावधीत सर्वत्र साजरा होणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

श्री. गणेशोत्सव २०२४ अनुषंगाने दि. ०२/०९/२०२४ रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय शांतता कमीटी बैठक पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे घेण्यात आली. त्यामध्ये सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस दला मार्फत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सुचना दिल्या आहेत.

– ज्या गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबवीली जाईल अशा गावांना जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत प्रशस्ती पत्र देण्यात येईल.

– पोलीस ठाणे स्तरावर पोलीस ठाणे हददीतील प्रथम तीन उत्कृष्ठ सार्वजनीक गणेश मंडळांना बक्षीस देण्यात येईल.

– उपविभाग स्तरावर उपविभागातील प्रथम तीन उत्कृष्ठ सार्वजनीक गणेश मंडळांना बक्षीस देण्यात येईल.

– सर्व उपविभागातील प्रथम तीन उत्कृष्ठ सार्वजनीक गणेश मंडळांना पैकी तीन उत्कृष्ठ मंडळांना जिल्हा स्तरावर बक्षीस देण्यात येईल.

– पर्यावरणपूरक व डीजे / डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करावा.

– प्रत्येक सार्वजनीक मंडळांनी किमान ०१ सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याबाबत सुचना देण्यात आली आहे.

– ज्या शहरामध्ये / गावामध्ये एकाच दिवशी ईद ए मिलाद व गणेश मंडळाच्या मिरवणुका निघणार आहेत. अशा ठिकाणी हिंदु व मुस्लिम बांधवांनी समन्वय ठेवुन मिरवणुका काढाव्यात. जेणे करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.

– गणेश उत्सवामध्ये जास्तीत जास्त वृक्षारोपण, रक्तदान यासारखे सामाजीक उपक्रम राबवावेत.

या बैठकी करीता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग – ठाकुर, उपविभागीय पोलीस अधीकारी संकेत देवळेकर, श्री. यामावार, श्री. भोसले व जिल्हयातील सर्व पोलीस अधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य, सार्वजनीक गणेश मंडळाचे अध्यक्ष हे हजर होते. मिटींगचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी केले.

Related Articles

Back to top button