पोलीस

सोलापूर तालुका पोलीस अलर्ट!

Solapur Taluka Police Station Activity News

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : गणपती उत्सव व इतर महत्वाचे उत्सव शांततेत पार पाडण्याचे अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रूट मार्च करण्यात येत आहे. तसेच बदलापुर येथील घटनेच्या अनुषंगाने शाळेमधील विद्यार्थी व शिक्षक यांना समुपदेशन करण्यात येत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

आगामी काळात साजरा होणारा गणपती उत्सव व इतर महत्वाचे उत्सव शांततेत पार पाडुन कोणताही अनुचित प्रकार न होता कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या अनुषंगाने अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक व संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंग, सोमनाथ कदम, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुनिल बनसोडे, शहाजी कांबळे, हवेल जाधव व सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले पुरूष व महिला पोलीस अंमलदार यांनी बोरामणी येथे रूट मार्च ( पथ संचलन ) व जमाव पांगविण्यासाठी कवायत प्रात्यक्षिक करून दाखविले आहे.

बदलापुर जि.ठाणे येथे शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक नागाबाई गंपले यांनी मौजे पाकणी येथील निवासी आश्रम शाळेस भेट देऊन तेथे इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणा-या विद्यार्थिनींना बॅड टच, गुड टच इत्यादी विषयक मार्गदर्शन केले. तसेच बालकाविषयी व महिला विषयक गंभीर अपराधांची माहिती देऊन त्यांचे मध्ये जागरूकता कशी असली पाहिजे, त्यांनी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे या विषयक मार्गदर्शन केले. मोबाईल व सोशल मिडियाव्दारे होणा-या अपराधांची माहिती देऊन विद्यार्थिनी सोबत संवाद साधुन शाळे मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना विद्यार्थ्यांच्या बाबतीत सतर्क राहणेच्या सूचना दिल्या आहेत.

सोमनाथ कदम, सहायक पोलीस निरीक्षक यांनी बदलापुर येथील घटनेच्या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाणे अंतर्गत जिल्हा परिषद शाळा उळे येथील विद्यार्थ्यांना गुड टच, बॅड टच संदर्भात मार्गदर्शन केले आहे. तसेच शाळेतील उपस्थित शिक्षकांना सतर्क राहणेच्या सूचना दिल्या आहेत.

मनोज अभंग, सहायक पोलीस निरीक्षक यांनी एस.व्ही.सी.एस. कनिष्ठ महाविद्यालय, बोरामणी येथील विद्यार्थी यांना समुपदेशन करून त्यांना मार्गदर्शन करून महाविद्यालय मधील शिक्षकांना सतर्क राहणेच्या सूचना दिल्या आहेत. यापुढेही आगामी काळात येणारे उत्सवाच्या अनुषंगाने रूट मार्च (पथ संचलन) तसेच बदलापुरच्या घटनेच्या अनुषंगाने शाळे मध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थी व शिक्षक यांचे मध्ये कायद्याची जगजागृती व्हावी या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे शाळेस भेटी देणार असल्याचे संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांनी सांगितले आहे.

Related Articles

Back to top button