उमेदवारीबाबत पत्रकार दिलीप शिंदेंची फडणवीसांसोबत चर्चा
Solapur Loksabha Election BJP Dilip Shinde News
सोलापूर : सोलापूरचे पत्रकार, दैनिक नालंदा एक्सप्रेसचे संपादक दिलीप शिंदे सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक आहेत. भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. पत्रकार आणि बौद्ध समाजातील कार्यकर्ता म्हणून त्यांना उमेदवारी मिळू शकते.
दिलीप शिंदे म्हणाले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी त्यांच्या सागर बंगला निवासस्थानी चर्चेसाठी मला सकाळी वेळ दिली होती. त्यानुसार त्यांच्यासमवेत चर्चा झाली. दिलीप शिंदे यांनाच उमेदवारी का द्यावी यावर चर्चा करण्यासाठी त्यांनी मला दहा मिनिटे वेळ दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी माझे सविस्तर ऐकून घेतले. पत्रकारितेत मंत्रालयात सुमारे सोळा वर्षे पत्रकारिता केल्याचा मला अनुभव आहे. तसेच सोलापूरच्या प्रश्नांची आणि इतर ठिकाणच्या प्रश्नांची मला जाण असल्याचे मी त्यांना पटवून सांगितले.
सन 1990 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये स्व. प्रमोदजी महाजन, स्व. लिंगराजजी वल्याळ, आ. विजयकुमार देशमुख, किशोरजी देशपांडे, मोहिनी पत्की, नरसिंग मेगजी यांच्या सोबत काम केलेला मी जुना कार्यकर्ता असल्याचे त्यांना चर्चेदरम्यान सांगितले.
बूथ यंत्रणेपासून मोठ्या सभा लावण्यापर्यंतचे मी काम केले आहे. पक्षाच्या ध्येय धोरणाशी बांधील आहे. तसेच पक्षाच्या विविध यंत्रणेत काम केले असल्याचे त्यांना सागितले.
मी हिंदू महार बौद्ध जातीचा असल्याने सोलापूर लोकसभा मतदारसंघात आंबेडकरी समाजाची जवळपास अडीच लाख मते मिळणार आहेत. समाजामध्ये मी चांगले काम आहे. तसेच इतर ठिकाणचे मतेही मला मिळू शकतात, हे यांना सांगितले.
महाराष्ट्रात 48 जागा लोकसभेच्या आहेत. या 48 मध्ये एक पत्रकार म्हणून मला उमेदवारी दिल्यास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेमध्ये आनंदच होईल.
विकासाच्या मुद्यावर दूरदृष्टी ठेवून काही प्रोजेक्ट संकल्पना मांडली आहेत. सोलापूरच्या विकासासंदर्भात माझ्याकडे ब्लू प्रिंट आहे. ते विकासाचे व्हिजन घेऊन मला आपल्या माध्यमातून काही प्रश्न दिल्ली दरबारातून होतील असे मी देवेंद्रजींना आवर्जून सांगितले आहे.