श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर
रविवारी होणार पुरस्कार वितरण सोहळा
सोलापूर : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रविवार दि ३१ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट यांनी दिली.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून दैनिक वृतपत्र व वृत्तवाहिन्याच्या पत्रकारांचा आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे सातवे वर्ष आहे. रविवार दि ३१ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजता रिध्दी-सिध्दी हाँल, विनायक हाँटेल, बाळीवेस येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी गुप्ता ट्रेडिंग कंपनीचे सीताराम गुप्ता, सोलापूर जिल्हा महिती अधिकारी सुनील सोनटक्के, सोलापूर मध्य रेल्वे सोलापूर मंडळचे ट्रेन मँनेजर संजय कोळी, खंडेलवाल समाजचे अध्यक्ष शाम खंडेलवाल, उद्योजक संकेत थोबडे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळयास सर्वानी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थापक महेश कासट, संतोष अलकुटे, महेश ढेंगले, अभिजित होनकळस, रविशंकर जवळे, प्रकाश आंळगे, गणेश येळमेली यानी केले आहे.
हे आहेत पुरस्काराचे मानकरी
समाधान वाघमोडे (इन सोलापूर न्यूज), महादेव आवारे (संचार), दीपक शेळके (सुराज्य), विजय साळवे (दिव्य मराठी), प्रकाश सनपूरकर (सकाळ), संदिप येरवडे (जनसत्य), प्रभूलिंग वारशेट्टी (तरूण भारत संवाद), मकरंद ढोबळे (स्वराज्य न्यूज) आदी पत्रकारांचा पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. सन्मान चिन्ह, सन्मान पत्र , शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.