सोलापूर शहर

हाताला काम द्या.. मशीन चालवा..

Solapur Readymade Kapad Utpadak Sangh News

HTML img Tag Simply Easy Learning

एकेरी पद्धतीचा टेंडर रद्द करा या मागणीसाठी सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

HTML img Tag Simply Easy Learning

हजारो कामगारांचा सहभागरा

ज्य सरकारच्या निर्णयावर तीव्र संताप

नवीन टेंडर पद्धतीमुळे 7 ते 8 हजार कामगार बेरोजगार होणार

सोलापूर : सन 2024 – 25 यावर्षीचे जिल्हा परिषद शाळेच्या गणवेशाचे टेंडर एकेरी पद्धतीने काढले आहे. 132 कोटीचा टेंडर रद्द करून पूर्वीप्रमाणेच कामाची पद्धत ठेवावी या मागणीसाठी सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघ व कामगार संघटनेने एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

क्षत्रीय गल्ली येथून निघालेल्या मोर्चाचे जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. हाताला काम द्या.. मशीन चालवा.. या घोषणा देत गारमेंट उद्योजक आणि कामगार वर्ग या मोर्चात मोठया संख्येने सहभागी झाले होते.

एकेरी टेंडर पद्धत रद्द करावे अशी मागणी या मोर्चामध्ये करण्यात आली. दरवर्षी प्रत्येक शाळेच्या शालेय समितीला व मुख्याध्यापकाला अधिकार दिला जातो की गणवेश कशा पद्धतीचे असावे त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य कापड व गणवेश मिळायला मदत होते. या टेंडर पद्धतीने विद्यार्थ्यांना योग्य गणवेश मिळणार नाही याचा अनुभव देखील मागच्या टेंडरच्या वेळी आलेला आहे. त्यामुळे शासनाने हि पद्धत रद्द करून जुन्या पध्दतीने गणवेशाचे काम द्यावे अशी मागणी गारमेंट उद्योजक प्रकाश पवार यांनी केली.

या टेंडर पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. शिवाय एकेरी टेंडर पद्धतीमुळे सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व रेडिमेड कापड उत्पादक उद्योजक आणि कामगारांना काम मिळणार नाही आणि मागील तीन महिन्यापासून एकही काम मिळालेले नाही. 7 ते 8 हजार कामगार बेरोजगार होतील अशी भीती गारमेंट उद्योजक अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

दरम्यान यावेळी संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाचे पदाधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button