सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन
---Advertisement---

अतुल कुलकर्णी सोलापूरचे नवे पोलीस अधीक्षक

On: August 14, 2024 7:48 AM
Follow Us:
---Advertisement---

IPS Atul Kulkarni Solapur SP News

सोलापूर : सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची पुण्याला बदली झाली असून त्यांच्या जागी धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले आहेत.

राज्यातील 29 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी काढले आहेत. त्यानुसार सोलापूरचे पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांची बदली पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी धाराशिवचे पोलीस अधीक्षक कुलकर्णी हे येत आहेत. तर धाराशिवच्या पोलीस अधीक्षकपदी बारामती येथील अपर पोलीस अधीक्षक संजय वाय. जाधव यांची नियुक्ती झाली आहे. सोलापूरच्या तत्कालीन पोलीस उपायुक्त व सध्या पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या अपर्णा गीते यांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, मुंबईचे सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे.

नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे मूळचे बेळगाव येथील आहेत. अभियंता असलेल्या अतुल कुलकर्णी यांना झाडांबद्दल विलक्षण प्रेम आहे. धाराशिवमध्ये अतुल कुलकर्णी यांच्या पुढाकारातून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झाले आहे.

मावळते पोलीस अधीक्षक सर देशपांडे यांच्या कार्यकाळात गुन्हेगारांवर चांगला वचक बसला होता. त्याचप्रमाणे मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात मेफेड्रीन या ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात यश आले होते. त्यांच्या कार्यकाळात लोकसभेच्या निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार न घडता निवडणूक शांततेत पार पडली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now