सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन

‘ब्लॉसम नर्सरी स्कूल’च्या माजी विद्यार्थी आणि गुरुजनांचा स्नेहसंगम!

On: March 2, 2026 6:28 PM
Follow Us:
HTML img Tag Simply Easy Learning

Blossom Nursery School Celebrates Silver Jubilee

HTML img Tag Simply Easy Learning

‘अग्रसेन हॉल’मध्ये २५ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : जुळे सोलापूर येथील अग्रगण्य शैक्षणिक संस्था ‘ब्लॉसम नर्सरी स्कूल’ चा २५ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा २८ फेब्रुवारी २०२६ रोजी आसरा चौक परिसरातील अग्रसेन भवन येथे अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात पार पडला. 

रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमात शाळेचा आजवरचा प्रवास आणि माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेच्या प्रदीर्घ प्रवासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या माजी शिक्षिका, माजी विद्यार्थी आणि माजी एम.टी.टी.सी. (MTTC) प्रशिक्षणार्थी यांना निमंत्रित करण्यात आले होते. शाळेच्या प्रगतीत योगदान दिल्याबद्दल या सर्वांचा संस्थेच्या वतीने गौरवपूर्वक सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. राजकुमार अग्रवाल (अध्यक्ष) होते, तर शाळेच्या संचालिका सौ. चित्रा अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे नेटके नियोजन करण्यात आले होते. या विशेष रौप्य महोत्सवी कार्यक्रमाची संपूर्ण संकल्पना संचालिका सौ. चित्रा अग्रवाल यांच्या कन्या शिवांगी अग्रवाल आणि अश्विनी अग्रवाल यांनी मांडली होती. कार्यक्रमाचे नाविन्यपूर्ण स्वरूप आणि नियोजन या दोघींच्या पुढाकारातून साकारले गेले. त्यांच्या कल्पकतेमुळे आणि अथक परिश्रमांमुळेच हा सोहळा अत्यंत नेटका आणि यशस्वी ठरला, ज्याचे उपस्थितांकडून भरभरून कौतुक झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंचवीस वर्षाच्या वाटचालीच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

छोट्या विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर आणि विषयांवर बहारदार नृत्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली. रौप्य महोत्सवानिमित्त शाळेचे अनेक जुने विद्यार्थी एकत्र आले होते, ज्यामुळे कार्यक्रमात एक वेगळीच रंगत भरली होती. माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षिका‌ या संकल्पनेमुळे कार्यक्रमात सर्वच वयोगटातील सदस्यांचा सहभाग लक्षणीय होता.

संस्थेच्या संचालिका सौ. चित्रा अग्रवाल यांनी आपल्या भाषणात शाळेच्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले आणि सर्व पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले. अध्यक्ष श्री. राजकुमार अग्रवाल यांनी संस्थेच्या भावी उपक्रमांविषयी शुभेच्छा दिल्या.

या रौप्य महोत्सवी सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरच्या माजी महापौर प्रा. सुशीला आबुटे, दंत रोग तज्ज्ञ डॉ. वर्षा जेढे आणि इंडियन मॉडेल स्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका कविता वाई यांची विशेष उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले आणि भावी पिढी घडवण्यात शाळेचा वाटा मोलाचा असल्याचे प्रतिपादन केले.

या सोहळ्यामुळे जुळे सोलापूर परिसरात ब्लॉसम नर्सरी स्कूलच्या शैक्षणिक वारशाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

नवीन ॲडमिशन सुरु..

पालक आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळेच आम्ही पंचवीस वर्षे यशस्वीपणे कार्यरत आहोत. भविष्यातही अनेक नवनवीन संकल्पना राबविण्यात येणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
– सौ चित्रा अग्रवाल, संचालिका
ब्लॉसम नर्सरी स्कूल, जुळे सोलापूर

Blossom Nursery School Jule Solapur
Silver Jubilee Celebration Solapur
25th Annual Function Blossom School
Agrasen Bhavan Solapur News
Chitra Agrawal Blossom Nursery
Best Nursery School in Solapur
School Annual Day 2026 Solapur

Join WhatsApp

Join Now

Subscribe Youtube Channel

Join Now