सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन

जुळे सोलापुरात गूढ आवाज! भूकंप की आणखी काही?

On: October 15, 2026 3:33 PM
Follow Us:
HTML img Tag Simply Easy Learning

Panic grips Jule Solapur residents after mysterious loud boom

HTML img Tag Simply Easy Learning

जुळे सोलापुरात गूढ आवाज! भूकंप की आणखी काही?

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर (स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडिया) : सोलापूर शहरातील जुळे सोलापूर परिसरात आज दुपारी पावणेतीन ते तीन वाजेच्या सुमारास झालेल्या एका प्रचंड गूढ आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. जुळे सोलापूर, सैफुल, आयएमएस शाळा परिसर तसेच साखर कारखाना परिसरापर्यंत हा आवाज स्पष्टपणे ऐकू आला.

या अचानक झालेल्या आवाजामुळे आणि जाणवलेल्या हादऱ्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून अनेक भागांत नागरिक भीतीने घराबाहेर पडले.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दुपारी साधारण २:५० च्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाल्यासारखा एकच तीव्र आवाज आला. यामुळे घरांच्या खिडक्यांची तावदाने हादरली आणि काही क्षणांसाठी जमीन हलल्याचा भास झाला. विहीर खोदताना होणाऱ्या सुरुंगाच्या स्फोटासारखा किंवा भूकंपासारखा हा हादरा असल्याचे नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. उत्तर सोलापूरचे तहसीलदार सैफुल आणि जुळे सोलापूर परिसरात दाखल झाले असून आवाजाच्या नेमक्या कारणाची खात्री करण्याचे काम सुरू आहे.

​या घटनेनंतर अनेक सोलापूरकरांनी ‘स्मार्ट सोलापूरकर’ डिजिटल मीडियाच्या कार्यालयात फोन करून याबाबतची माहिती दिली तसेच हा आवाज नेमका कशाचा होता, याबाबत विचारणा केली.

हा प्रकार नेमका कशामुळे घडला?

कोणत्याही प्रकारचा स्फोट, सोनिक बूम (विमानाचा आवाज) की भूगर्भातील पाण्याच्या पातळीत बदल झाल्यामुळे झालेली हालचाल—याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe Youtube Channel

Join Now