सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस; 5 हजार महिलांना मिळाला आशीर्वादाचा दिवा!

On: September 17, 2026 9:09 PM
Follow Us:
HTML img Tag Simply Easy Learning

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस; 5 हजार महिलांना मिळाला आशीर्वादाचा दिवा!

HTML img Tag Simply Easy Learning

ज्येष्ठ नेते मोहन डांगरे मित्र परिवाराचा उपक्रम

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आशीर्वादाचा दिवा हा कार्यक्रम संपूर्ण देशभरात केला जात आहे. अनावश्यक खर्चाला फाटा देत भाजपाचे शहर उपाध्यक्ष मोहन डांगरे मित्र परिवाराने तब्बल पाच हजार महिला आणि विद्यार्थिनींना पणती कीटचे वाटप केले.

प्रारंभी गुरुवारी सकाळी हरीभाई देवकरण महाविद्यालय आणि अनुसयाबाई रामचंद्र बुर्ला महिला महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थिनींना पणती किट वाटप करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, भाजपाच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, शि.प्र. मंडळीचे शाळा समिती अध्यक्ष ऍड. सुरेशबाबू मंकणी, संयोजक आणि भाजपाचे शहर उपाध्यक्ष मोहन डांगरे, भाजपचे शहर सरचिटणीस प्रा. डॉ. नारायण बनसोडे, उपाध्यक्ष प्रशांत फत्तेपूरकर, प्राचार्य डॉ. अशोक एक्कलदेवी, प्राचार्य प्रकाश कांबळे उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशालाच आपले घर मानून सातत्याने काम केले आहे. त्यांच्या सामाजिक आणि विकासात्मक कामाचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी, समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव लिहिताना वडिलांच्या नावा आधी आईचे देखील नाव लिहिण्याचा संकल्प करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सामाजिक जाणिवेचा आदर्श घेऊन विद्यार्थिनींनी विद्यापीठातर्फे राबविण्यात येणाऱ्या कॅन्सर प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी, ७५ हजार वृक्षारोपणाच्या कामासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी याप्रसंगी केले.

भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक भारतात स्त्रियांना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. गेल्या २५ वर्षात त्यांनी केलेल्या विकासाचा वेग प्रचंड आहे. घर तेथे शौचालय, उज्वला गॅस, लखपती दीदी अशा योजनांच्या माध्यमातून महिलांना आधार मिळण्यासाठी, महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी नरेंद्र मोदी यांच्या काळात झाली आहे. हजारो महिलांचा आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळावा याकरिता मोहन डांगरे मित्र परिवारातर्फे पाच हजार महिलांना पणती कीट देण्याचा आशीर्वादाचा दिवा कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचेही भाजप शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी सांगितले.

संयोजक आणि शहर भाजपाचे उपाध्यक्ष मोहन डांगरे म्हणाले, स्त्री ही समाजाची शक्ती आहे. कुटुंबासह समाजाचाही आधार आहे. स्त्रीशक्तीचा आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळावा याकरिता हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ऍड सुरेश मंकणी, प्रा. धन्यकुमार बिराजदार, प्रा. डॉ. नारायण बनसोडे यांनीही विविध योजना सांगत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बुर्ला महाविद्यालयात वृक्षारोपण देखील करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम चिट्याल, अविनाश शंकू, विवेक नक्का यांनी परिश्रम घेतले. भाजपा शहर उपाध्यक्ष मोहन डांगरे यांनी प्रास्ताविक केले तर प्रमोद चुंगे आणि यांनी डॉ. शंकर राजे सूत्रसंचालन केले.

  • Narendra PM Modi’s Birthday: 5,000 Women Gifted ‘Lamps of Blessing’ by Mohan Dangre Mitra Parivar

Join WhatsApp

Join Now

Subscribe Youtube Channel

Join Now