पोलीस

पोलिसांची सतर्कता; अवघ्या तीन तासात मुलीची सुटका!

Solapur Police Santosh Papade Umesh Chavan News

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : पोलीसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या तीन तासात अल्पवयीन बालिकेची सुटका झाली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

या घटनेची अधिक माहिती अशी की, दिनांक ११/१०/२०२४ रोजी सदर बझार पोलीस ठाण्यात रात्री ०२:१४ वाजता गुन्हा नोंद झाला होता. सदर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या व्यक्तीची पीडित बालिका १४ वर्षे ३ महिने हिचे सोबत दोन महिन्यापासून लग्न लावून द्या म्हणून 21 वर्षीय तरुण मागे लागला होता व सारखा तिचा पाठलाग करत होता.

सदर पडीतेचे वडील हे आरोपी यास पिढीतेस बोलू देत नसल्याने आरोपीने सदर पीडित अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन पीडित मुलीच्या वडिलांशी वाद घातला. व पीडित मुलीला तरुणाने जबरदस्तीने रात्री 10:30 च्या सुमारास पळवून नेले. पीडित मुलींच्या घरच्या लोकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही. त्यांनी सदर बझार पोलीस ठाणे येथे येऊन पोलीसांना हकीकत सांगितली.

पीडित महिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून देणे, महिलांवर होणाऱ्या अत्याचारा विरुद्ध कठोर पावले उचलणे तसेच बदलापूर घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आधीच आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने तात्काळ हद्दीतील सर्व पोलीस अधिकारी व पेट्रोलिंग करणारे कर्मचारी, मोबाईल तसेच सदर बझार डीबी पथकाला सदर पीडितेचा व आरोपीचा शोध घेणे कामी आदेश देण्यात आले. सदर आदेशाच्या अनुषंगाने सदर बझार पोलीस स्टेशनचे वॉरंट अंमलदार पोलीस हवालदार संतोष पापडे यांनी गुप्त बातमीदार मार्फत माहिती काढून सोबत पोलीस कॉन्टेबल १११९/उमेश चव्हाण यांना सोबतीला घेऊन घटना घडल्यापासून अवघ्या तीन तासात अल्पवयीन बालिकेचे अपहरण करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन आरोपी तरुणाला जेरबंद केले व आरोपीच्या ताब्यातून पीडित बालिकेची सुटका केली.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशान्वये तसेच पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवरी, सदर बझार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, दुय्यम पोलीस निरीक्षक श्री. ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष पापडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल उमेश चव्हाण यांनी पार पाडली.

Related Articles

Back to top button