पर्यावरण / पर्यटन

वर्धनगडावर स्वच्छता मोहिमेने शिवरायांना अभिवादन

वर्धनगडावर स्वच्छता मोहिमेने शिवरायांना अभिवादन

HTML img Tag Simply Easy Learning

इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम, शिवकालीन कारागृह वासोटा किल्ल्यावर भटकंती

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा येथील वर्धनगडावर स्वच्छता मोहिम राबवून सोलापुरातील इको फ्रेंडली क्लबच्या सदस्यांनी शिवरायांना आगळ्यावेगळ्या पध्दतीने अभिवादन केले. यासोबतच शिवकालीन कारागृह असलेल्या वासोटा किल्ल्यावर भटकंती केली. या उपक्रमात 75 हून अधिक निसर्गप्रेमींनी सहभाग नोंदविला.

HTML img Tag Simply Easy Learning

शिवजयंतीनिमित्त इको फ्रेंडली क्लबच्यावतीने वासोटा जंगल आणि वर्धनगड येथे भटकंतीचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. शुक्रवार दि. 16 फेबु्रवारी रोजी सायंकाळी इको फ्रेंडली क्लबची टीम सातार्‍याकडे रवाना झाली. शनिवारी सकाळी इको फ्रेंडली क्लबच्या सदस्यांचा जथ्था सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ला परिसरात पोचला.

शेंबडी गावातील किसन साळुंखे यांच्याआरोही टेंट हाऊसमध्ये सर्वांच्या फ्रेश होण्याची, चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. तासभर बोटींग करुन सर्वजण वोसाटा किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या वन विभागाच्या चेक पॉईंटवर पोचले. शिवसागर जलायशात इतका वेळ बोटींग करुन सोलापूरकर भारावून गेले होते. वन विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन जंगल भटकंतीला सुरुवात झाली.

घनदाट जंगलातील पायवाटेने निसर्गाचा आनंद घेत सर्वजण दोन तासात वासोटा किल्ल्यावर पोचले. उंचावरुन दिसणारा शिवसागर जलाशय, व्याघ्रगड, कोयना अभयारण्य परिसर निसर्ग किती अफाट आहे हेच दाखवून देत होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय.. भारत माता की जय.. शिवयोगी सिध्दरामेश्वर महाराज की जय.. आदी घोषणा देवून सर्वांनी आपला आनंद व्यक्त केला. वनभोजनानंतर गडफेरीला सुरुवात झाली. किल्लेदाराचा वाडा, मारुती मंदिर, चुन्याचा घाणा, पाण्याचे टाके, बाबू कडा, शिवमंदिर आदी ठिकाणांना इको फ्रेंडली क्लबच्या सदस्यांनी भेट दिली. बाबू कडा येथील इको पॉईंटवर छत्रपती शिवाजी महाराज की जय.. यासह विविध घोषणा देवून घुमणार्‍या आवाजाचा अनुभव घेतला.

तासाभराच्या भटकंतीनंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. जंगल वाटेनेच खाली आल्यानंतर बोटींग करत सर्वजण शेंबडी गावात पोचले. आरोही टेंट हाऊसमध्ये रात्रीच्या मुक्कामाची, जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. आयुष्यात पहिल्यांदाच टेंट कॅम्पिंगचा आनंद अनेकांनी घेतला. गावरान जेवणानंतर विविध खेळ, गाणी आणि डान्स करत सर्वांनी धमाल केली.

रविवारी सकाळी फ्रेश झाल्यानंतर आरोही टेंट हाऊसचे संचालक किसन साळुंखे आणि कुटूंबीयांना सोलापूरी चादर, शेंगा चटणी भेट देवून उत्तम व्यवस्थेबद्दल आभार मानण्यात आले.

त्यानंतर शेंबडी गावातील दत्त मंदिर, मठ परिसरात सर्वजण दाखल झाले. शांत, सुंदर परिसरातील मंदिरात सर्वजण नतमस्तक झाले.

काही वेळ घालवल्यानंतर पुन्हा बस प्रवास करत कास पठार, सातारा, कोरेगाव मार्गे इको फ्रेंडली क्लबचा जथ्था वर्धनगडच्या पायथ्याला दाखल झाला. सुनील यादव यांच्या हॉटेल जय मल्हार येथे दुपारचे जेवण केले.

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत सर्व शिवप्रेमी काही वेळातच वर्धगडावर पोचले. वर्धनीमातेचे दर्शन घेतले. इतिहास जाणून घेतल्यानंतर उंचावरुन दिसणारे सुर्यास्त अनुभवले. वर्धनगडावर प्लास्टिकचा कचरा गोळा करुन सर्वांनी शिवरायांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन केले. गोंदवले येथील चैतन्य भोसले यांच्या हॉटेल विराटमध्ये रात्रीचे जेवण करुन परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. शिवजयंतीच्या पहाटे सर्वजण सोलापुरात परतले.

इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, समन्वयक अजित कोकणे, सदस्य संतोषकुमार तडवळ, डॉ. ननवरे, सीए ललीत मगदुम, पत्रकार विनायक होटकर, अ‍ॅड. गाजुल यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमात डॉ. शुभांगी कनकी, आरव कनकी, नीता चिपडे, सलोनी चिपाडे, सहिषा चिपाडे, नेहा शशांक कुलकर्णी, गिरीश प्रभाकर घोगले, सौ. ऊमा गिरीश घोगले, प्रा. जीवराज सावळे, आरोही सावळे, सुवर्णा सावळे, सुवर्णा सावळे, डॉ. श्वेता दत्तात्रय मुसळे, एमआर दत्तात्रय मुसळे, शिक्षक सोमनाथ रामचंद्र गुंजोटे, पोलीस अंमलदार इंदिरा गुंजोटे, शिक्षिका परिचिता शहा, सीए ललित मगदूम, स्वाती मगदूम, रिया मगदूम, परम मगदूम, समिक्षा गवंडी, मनोरमा बँकेच्या संचालिका सुनीता पाटील, प्रतिज्ञा भोसले, संजय टोळे, गोविंद पाटील, अथर्व स्वामी, आर्यन शैलेश परांजपे, विश्वजित आंधळकर, नितीन चिदानंद पुरवंतस्वामी, समर्थ शेरखाने, पत्रकार विनायक होटकर, मनिषा होटकर, समर्थ होटकर, आर्यन होटकर, रजनी कंदीकटला, जयश्री आडके, हार्दिक आडके, स्नेहल बडबडे, गौसपाक उस्मान हल्याल, नफिसा गौसपाक हल्याल, इरम, गंगुबाई कोकणे, पूजा शेरखाने-कोकणे, डॉ.मंजुषा प्रवीण ननावरे, डॉ. सायली चांदेकर, डॉ. स्वाती जावळे, अंकिता शिंदे, संगमनाथ नागोजी, सनी पाटील, सचिन कांबळे, शैलजा घाटे, शशिकला गायकवाड, अजिंक्य जाधव, सार्थक आसबे, तनिष्क गायकवाड, प्रेमा कुंभार, अनुराधा जाधव, सेजल जाधव, अपूर्वा कुलकर्णी, झिया जमादार, अर्चना संगेवाडीकर, संचेता राठी, मृणाल पात्रुडकर, मैत्रेयी पात्रुडकर, प्रा. श्रीनिवास जगताप, सुचिता जगताप, समृद्धी जगताप, वैद्य प्रवीण बिरगे, शर्मिला करपे, कनिष्का करपे, अर्चना बोधे यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

बेंगलोर येथून अर्चना बोधे यांचा सहभाग
शिवजयंतीनिमित्त आयोजित वासोटा जंगल भटकंतीमध्ये सहभागी होण्यासाठी खास बेंगलोर येथून अर्चना बोधे या आल्या होत्या. त्यांना मैत्रिण प्रा. शर्मिला करपे यांचे प्रोत्साहन मिळाले.

छोट्यांचा उत्साही सहभाग
वासोटा जंगल आणि वर्धनगड जंगल भटकंतीमध्ये छोट्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदविला. यात आरोही सावळे, आरव कनकी, इरम हल्याळ, हार्दिक आडके यांचा सहभाग होता.

ही निसर्ग भ्रमंती आनंददायी होण्यासाठी चडचणकर ट्रॅव्हल्सचे संचालक सोमनाथ चडचणकर, बस चालक श्री. मस्के, सहाय्यक आतीश तांबे यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Back to top button