सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन
---Advertisement---

संभाजी ब्रिगेड शहराध्यक्षपदी शिवश्री शिरीष जगदाळे

On: July 20, 2024 5:39 PM
Follow Us:
---Advertisement---

Shivshree Shirish Jagdale as Sambhaji Brigade City President

सोलापूर : संभाजी ब्रिगेडच्या शहराध्यक्षपदी शिरीष जगदाळे व वकील आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश कदम यांची निवड करण्यात आली.

संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्या सूचनेनुसार सोलापुरातील संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक हॉटेल ऐश्वर्या येथे पार पडली. या बैठकीमध्ये संभाजी ब्रिगेडच्या शहराध्यक्षपदी शिवश्री शिरीष जगदाळे यांची निवड करण्यात आली तसेच वकील आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश कदम यांच्या निवडीचे पत्र संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम व जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे शाम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सिताराम बाबर, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अरविंद शेळके, नितेश बोराडे, पवन कुमार पाटील, संजय पारवे, संजोग सुरतगवंकर, नागेश घोरपडे, मनीष बोराडे, विवेक स्वामी, लखन गायकवाड, यशवंत लोंढे, बसवराज आळंदी, सागर शिंदे, माऊली सुरवसे, तुकाराम पाटील, अजय मस्के, विजय जतकर, शुभम मल्लू, भंडारी नितीन देवकते चंद्रशेखर कंटीकर, शेखर चौगुले, रमेश चव्हाण, विजय बिल्ली गुरु नागेश बिराजदार रुपेश कुमार किरसावंळगी नागेश भुजबळ, तुकाराम पाटील आदी उपस्थित होते.

कोण आहेत शिरीष जगदाळे?

उद्योजक शिरीष विष्णू जगदाळे हे छात्रवीर प्रतिष्ठान आणि शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. माजी जिल्हाध्यक्ष मराठा उद्योजक कक्ष, छत्रपती संभाजी महाराज जयंती व राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतात. रक्तदान शिबिर घेणे, त्याचबरोबर संभाजी महाराज जयंतीला छत्रपती संभाजी महाराजांच्या विविध मंडळांना मूर्ती वाटप करणे आदी उपक्रम राबविले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now