सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन
---Advertisement---

‘दक्षिण’मध्ये अमर पाटील यांच्या पदयात्रांना प्रतिसाद

On: November 12, 2024 11:40 AM
Follow Us:
---Advertisement---
HTML img Tag Simply Easy Learning

‘दक्षिण’मध्ये अमर पाटील यांच्या पदयात्रांना प्रतिसाद

HTML img Tag Simply Easy Learning

जनतेच्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील यांना मतदार संघातील पदयात्रांमध्ये नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.

विजापूर रोड परिसरातील शिमला नगर, पापराम नगर, कोठ्णीस नगर, द्वारका नगर, माशाळ वस्ती, ग्रीन युनिटी पार्क, पंचमुखी गणपती, पाटील नगर, कित्तूर चन्नमा नगर, अनुपम पार्क, विवेकानंद नगर भाग १/२, सवेश नगर, सैफुल परिसर, शहा नगर तसेच अन्य परिसरांमध्ये अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा आणि गृहभेटींचे आयोजन करण्यात आले.

अमर पाटील यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या दैनंदिन समस्यांवर सखोल चर्चा केली. स्थानिक नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

या दौऱ्यात नागरिकांनी अमर पाटील यांच्याप्रती असलेला विश्वास व्यक्त केला. विकासासाठीचे त्यांचे मनोबल आणि स्थानिकांना दिलासा देण्याचे त्यांचे आश्वासन पाहता, दक्षिण सोलापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी चालवलेला संवाद दौरा अधिक महत्त्वाचा ठरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe Youtube Channel

Join Now