सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन
---Advertisement---

विनायक कोंड्याल महापौर ‌तर ज्ञानेश्वरी देवकर उपमहापौर!

On: February 2, 2026 11:45 AM
Follow Us:
---Advertisement---
HTML img Tag Simply Easy Learning

Solapur Mahapaur Vinayak Kondyal Up Mahapaur Dnyaneshwari Devkar News

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी भारतीय जनता पार्टीने आपली रणनीती स्पष्ट केली आहे. महापौरपदासाठी भाजपचे नगरसेवक विनायक कोंड्याल (Vinayak Konydal BJP Solapur) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, उपमहापौरपदासाठी ज्ञानेश्वरी देवकर (Dnyaneshwari Devkar) यांचे नाव फायनल करण्यात आले आहे. या निवडीमुळे सोलापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘कोठे’ कुटुंबाचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

विनायक कोंड्याल हे आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी आहेत. विशेष म्हणजे, मागील कार्यकाळात देवेंद्र कोठे यांच्या सासू श्रीकांचना यन्नम यांनी महापौरपद भूषवले होते. आता त्यांच्याच कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला, म्हणजेच विनायक कोंड्याल यांना ही संधी मिळत असल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Smart Solapurkar – Solapur Mahanagarpalika Mahapaur News

अंतर्गत विरोधानंतरही कोंड्याल यांच्या नावावर शिक्कामोर्तब

विनायक कोंड्याल यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ‘बाहेरून’ आलेल्या नेत्याला इतक्या महत्त्वाच्या पदाची संधी दिली जात असल्यामुळे पक्षातील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि जुन्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला विरोध दर्शवला होता. मात्र, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कोंड्याल यांच्या नावाचा आग्रह धरत त्यावर अंतिम शिक्कामोर्तब केल्याचे समजते. पालकमंत्र्यांच्या या निर्णयामुळे अंतर्गत विरोध मावळला असून आता भाजप एकदिलाने निवडणुकीला सामोरे जात असल्याचे चित्र आहे.

उपमहापौरपदी महिलेला संधी

दुसरीकडे, उपमहापौरपदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांच्या नावाची चर्चा असून त्यांच्या उमेदवारीमुळे महिला प्रतिनिधीत्वाला वाव मिळणार आहे. आमदार सुभाष देशमुख यांचे समर्थक आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महेश देवकर यांच्या त्या पत्नी आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment