सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन
---Advertisement---

गीतरामायण आता कटपुतली बाहुल्यांच्या रूपात!

On: February 26, 2026 3:50 PM
Follow Us:
---Advertisement---
HTML img Tag Simply Easy Learning

Geet raramayan now in the form of puppets Soham Yemul Show

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : सोलापूर शहराचा १५० वर्षांचा प्रदीर्घ वारसा जपणारी संस्था ‘हिराचंद नेमचंद वाचनालय’ यांच्या वतीने एका अत्यंत अनोख्या आणि प्रेक्षणीय सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

वाचनालयाच्या माध्यमातून संगीत आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य अविरत सुरू असून, याच परंपरेचा भाग म्हणून थायलंडमधील तीन यशस्वी आंतरराष्ट्रीय प्रयोगांनंतर युवा कलाकार सोहम येमुल हा आता सोलापूरकरांसाठी ‘बाहुली नाट्य’ सादर करणार आहे.

विशेष म्हणजे, सोहम येमुल हा भारतातील सर्वात कमी वयाचा बोलक्या बाहुल्या आणि कटपुतली सादर करणारा कलाकार म्हणून ओळखला जातो. या प्रयोगाचे मुख्य आकर्षण म्हणजे गदिमा आणि सुधीर फडके (बाबूजी) यांच्या सुमधुर स्वरांनी सजलेले अजरामर ‘गीतरामायण’ बाहुल्यांच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून, यामध्ये प्रथमच ओठ हलणाऱ्या कटपुतली बाहुल्यांच्या साहाय्याने रामायणातील प्रसंग जिवंत केले जाणार आहेत.

आपली महान हिंदू संस्कृती आणि कला यांचा हा सुरेख संगम विशेषतः शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे. हा कार्यक्रम रविवार, १ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अँफी थेटरमध्ये संपन्न होईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, सोलापूरच्या शाळांमधील जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांनी या अद्भुत सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन वाचनालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe Youtube Channel

Join Now