सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन

पश्चिम महाराष्ट्र संघटकपदी परशुराम कोकणे

On: March 17, 2026 12:33 PM
Follow Us:
HTML img Tag Simply Easy Learning

Digital Media Sampadak Patrkar Sanghatana Parshuram Kokane News

HTML img Tag Simply Easy Learning

अखिल भारतीय ‌डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे नवे पदाधिकारी जाहीर

HTML img Tag Simply Easy Learning

विकास कस्तुरे सोलापूर शहर अध्यक्षपदी निवड तर सचिन जाधव कार्याध्यक्ष, विक्रम इंगळे उपाध्यक्ष, सचिन सावंत यांची सचिवपदी निवड

प्रशांत कटारे, परशुराम कोकणे यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी

सोलापूर : अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सोलापूर शहराध्यक्ष, स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाचे संपादक परशुराम कोकणे यांच्याकडे आता पश्चिम महाराष्ट्र संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली. संघटनेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने, प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण नागणे, जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

नूतन पदाधिकाऱ्यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी जाहीर केली आहे. सोलापूर शहर अध्यक्षपदी विकास कस्तुरे , कार्याध्यक्षपदी सचिन जाधव, उपाध्यक्षपदी विक्रम इंगळे, तर सचिव पदी शिवाजी सावंत यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे या बैठकीत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी प्रशांत कटारे यांची तर पश्चिम महाराष्ट्र संघटकपदी परशुराम कोकणे यांची निवड करण्यात आली आहे.

शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने सर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण नागणे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती.

नूतन पदाधिकाऱ्यांना राजा माने सर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

राजा माने सर यांनी आपल्या मनोगतात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची संपूर्ण देशभरात वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या उन्नतीसाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडण्यात आलेले नूतन पदाधिकारी पुढील प्रमाणे
* पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष: प्रशांत कटारे
* पश्चिम महाराष्ट्र संघटक : परशुराम कोकणे
सोलापूर शहराची नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे

विकास कस्तुरे : अध्यक्ष
सचिन जाधव : कार्याध्यक्ष
रवींद्र जोगीपेठकर : सरचिटणीस
विक्रम इंगळे : उपाध्यक्ष
इमरान सगरी : उपाध्यक्ष
चंदन बोल्लू : खजिनदार
शिवाजी सावंत : सचिव
शहानवाज शेख : संघटक
अकबर बागवान : प्रसिद्धीप्रमुख
कार्यकारणी सदस्य पुढील प्रमाणे:
आप्पा बनसोडे, जहूर सय्यद, अनिल कांबळे , अर्जुन चव्हाण, साकिब शेख, प्रसाद ठक्का, योगेश कल्याणकर, बालाजी चिटमिल, दयानंद मामड्याल , इकबाल शेख , आबादी राजे

Join WhatsApp

Join Now

Subscribe Youtube Channel

Join Now