सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन

कार्तिकेयन एस सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी

On: April 2, 2026 9:02 PM
Follow Us:
HTML img Tag Simply Easy Learning

Karthikeyan S New Collector of Solapur Kumar Ashirwad Transferred to Nagpur

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी Solapur collector Kumar ashirwad कुमार आशीर्वाद यांची बदली नागपूरच्या जिल्हाधिकारी पदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. ias karthikeyan s यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी या संदर्भातील आदेश निर्गमित केले आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning

कुमार आशीर्वाद यांची यशस्वी कारकीर्द

दोन वर्षे नऊ महिन्यांच्या कार्यकाळात कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यात आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांच्या कार्यकाळात सोलापूर विमानसेवेचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावून प्रत्यक्ष विमानसेवा सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

जिल्हा प्रशासनात पारदर्शकता आणि शिस्त आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

आषाढी वारीचे नेटके नियोजन करण्यासोबतच पंढरपूर कॉरिडॉरचा प्रश्न अत्यंत कौशल्याने हाताळून तो अंतिम टप्प्यात आणला आहे.

सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी ‘आयटी पार्क’च्या उभारणीत त्यांनी विशेष रस घेऊन काम केले.

या उल्लेखनीय कामगिरीमुळेच त्यांची नियुक्ती राज्याची उपराजधानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर येथे करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

नवे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. कोण आहेत?

सोलापूरची धुरा सांभाळणारे कार्तिकेयन एस. हे २०२० बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत. कार्तिकेयन एस. यांच्या प्रशासकीय अनुभवाचा आणि त्यांच्या सीए (CA) पदवीचा सोलापूरच्या आर्थिक आणि विकासात्मक कामांना गती मिळण्यासाठी मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • सोलापूर जिल्हाधिकारी (Solapur Collector)
  • ​कार्तिकेयन एस (Karthikeyan S IAS)
  • ​कुमार आशीर्वाद (Kumar Ashirwad IAS)
  • ​सोलापूर न्यूज (Solapur News)
  • ​जिल्हाधिकारी बदली (Collector Transfer News

​#Solapur #SolapurNews #IAS #DistrictCollector #KumarAshirwad #KarthikeyanS #MaharashtraGovernment #Nagpur #SmartSolapurkar #AdministrativeNews

Join WhatsApp

Join Now

Subscribe Youtube Channel

Join Now