सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन
---Advertisement---

अखेर अंड्याला येरवड्यात पाठवलं!

On: May 25, 2024 2:09 PM
Follow Us:
---Advertisement---
HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : मोटारसायकल चोरी करणारा गुन्हेगार आकाश ऊर्फ अंड्या मोहन वडतिले याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर शहरातील जेलरोड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार आकाश ऊर्फ अंडया मोहन वडतिले (वय २५ वर्षे, रा. मराठा वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) हा मागील काही वर्षापासुन सातत्याने घातक शस्त्राचा वापर करुन मोटार सायकल चोरी, घरफोडी, जबरी चोरी करताना ईच्छापुर्वक दुखापत करणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे, तडीपार आदेशाचा भंग करणे, घराविषयी आगळीक, दगडफेक करणे आणि घातक शस्त्रांनी धमकी देणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने, अवेध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे. त्याच्या विरुध्द अश्या प्रकारे गंभीर स्वरुपाचे एकुण १८ गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरीकांचे देनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. आकाश ऊर्फ अंडया मोहन वडतिले याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे, त्याची सोलापुर शहरातील व्यापारी व सामान्य नागरीकांमध्ये दहशत असुन, त्याचे विरुध्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत.

HTML img Tag Simply Easy Learning

आकाश ऊर्फ अंड्या मोहन वडतिले यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०१३ व २०१५ मध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार आणि सन २०२१ मध्ये एमपीडीए कायदयान्वये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही आकाश ऊर्फ अंड्या वडतिले याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालु ठेवली. त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी दि.२४/०५/२०२४ रोजी त्याचे विरुध्द एमपीडीए अधिनियम, १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन दि.२५/०५/२०२४ रोजी स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आली आहे.

ही कारवाई एम. राज कुमार, मा. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. दीपाली काळे पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), मा. विजय कबाडे पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, अशोक शा. तोरडमल, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-०१, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, अरविंद माने, वपोनि, जेलरोड पोलीस ठाणे, पोउपनि/विशेंद्रसिंग बायस गुन्हे शाखा, एमपीडीए पथकातील अंमलदार पोहेकॉ-/८३३ विनायक संगमवार, पोहेकॉ/१२५४ सुदीप शिंदे, पोशि/१९१६ अक्षय जाधव, पोशि/६५४ विशाल नवले यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe Youtube Channel

Join Now