पावसाळी मोहिमेतून मिळाली शिवरायांची ऊर्जा!
Hindavi Pariwar Pawsali Mohim Dr Shivratna Shete News
सोलापूर : राष्ट्रप्रथम वंदे मातरम् या विचारावर चालणारी हिंदवी परिवाराची पन्हाळगड ते पावनखिंड ही पावसाळी मोहीम संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवरत्न शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
यंदाच्या ह्या मोहिमेत 475 शिवभक्तांनी सहभाग नोंदविला होता. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ह्यामध्ये 73 महिलांनी आपला सहभाग नोंदविला होता. तसेच सोलापूर शहर व जिल्ह्यातुन एकूण 190 शिवभक्त तर अहमदनगर, अकलूज, अकोला, अमरावती, बीड, भुसावळ, बुलढाणा, जालना, मंगळवेढा, वाशीम, मिरज, नागपूर, नाशिक, शेवगाव, पुणे राहुरी, फलटण, कोल्हापूर, ठाणे आदी ठिकाणाहून असंख्य शिवभक्त ह्या पदभ्रमंती मोहिमेत सहभागी झालेले होते.
मोहिमेची सुरुवात नरवीर शिवा काशीद व नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पन्हाळगड येथील पुसाटी बुरुजापासून झाली.
मोहिमेची सांगता काडसिद्धेश्वर महास्वामीजींच्या उपस्थितीत सिद्धगिरी मठ कणेरी, कोल्हापूर येथे झाली. याप्रसंगी हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवरत्न शेटे यांनी तीन दिवसीय मोहिमेचे ऐतिहासिक महत्व, छत्रपती शिवरायांच्या पन्हाळातून झालेली सुटका, त्या ठिकाणी बलिदान दिलेले नरवीर शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह अनेक मावळ्यांनी स्वराज्यासाठी दिलेली बलिदान या सर्व घटनांची आठवण ओजस्वी वाणीतून सर्व सहभागी शिवभक्तांना करून दिली.
याप्रसंगी मोहीम सरनोबत डॉ. संभाजी भोसले, रामकृष्ण पाटील, धारेश्वर तोडकरी, अभिषेक गांधी, महेश शिंदे, भूषण बापट, दिलीप मेसरे, समाधान अवताडे, अमृत काटकर, वसंतराव झावरे, विनायक दुदगी, लक्षण वाघ, प्रकाश सरनाईक, लक्ष्मण लेंगरे, सचिन भोसले, दादू कांबळे, उमेश भालसिंग, नितीन धांडे, विजय पोखरकर, जगन्नाथ राऊत, संतोष शेटे, अजय भोयर, परशुराम कोकणे आदींसह विविध जिल्ह्याप्रमुख, विभागप्रमुख व हिंदवी परिवारातील शिवभक्तांनी मोहिमेच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
कणेरी मठाला भेट
यंदाच्या वर्षी प्रथमच कायदा सुव्यवस्थेच्या कारणावरून पोलीस प्रशासनाने पांढरपाणीपासून पुढे जाण्यास बंदी केल्याने पावसाळी मोहिमेचा शेवटचा टप्पा पूर्ण होऊ शकला नाही. हिंदवी परिवाराच्या माध्यमातून सर्व शिवभक्तांनी शेवटच्या दिवशी कोल्हापुरातील कणेरी मठाला भेट देऊन या ठिकाणी चालणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली.
मोहिमेचे 15 वे वर्ष
हिंदवी परिवाराच्या पावसाळी मोहिमेचे यंदाचे पंधरावे वर्ष होते. प्रत्येक मोहिमेत सुसज्ज अशी रेस्क्यू टीम, डॉक्टर पथक,संपूर्ण मोहिमेत हिंदवी परिवाराची स्वतःची कार्डियाक अंबुलन्स प्रत्येकवेळी मोहिमेत 12 वर्षांपासून ते 45 वर्ष्याच्या अबाल वृध्दांचा सहभाग होता.