गुन्हे वृत्त

जुळे सोलापुरात सापडला सोन्याचा हंडा!

Jule Solapur Sone Handa Gold Handa Crime News

Jule Solapur Sone Handa Gold Handa Crime News

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : जुळे सोलापुरातील डी मार्ट परिसरामध्ये खोदकाम करताना सोन्याने भरलेला हंडा सापडला आहे. तो तुम्ही घेणार का? असे म्हणून गोविंदश्री मंगल कार्यालय परिसरातील भंगार दुकान चालकाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

गोविंदश्री मंगल कार्यालयासमोर सुभाष ननवरे यांचे भंगार दुकान आहे. 24 जानेवारी रोजी एक व्यक्ती त्यांच्याकडे भेटण्यासाठी आला. मला भंगार विकायचे आहे असे त्याने सांगितले.

भंगारबाबत ठेकेदाराला विचारून तुम्हाला कळवतो असे म्हणून त्याने भंगार दुकान चालक सुभाष ननवरे यांचा मोबाईल क्रमांक घेतला. 2 दिवसानंतर म्हणजे 27 जानेवारी रोजी तो व्यक्ती सुभाष ननवरे यांना भंगार दुकानात भेटण्यासाठी आला. सोबत आणखीन त्याचा सहकारी होता.

आम्ही राजस्थान येथून आलो आहोत. जुळे सोलापुरातील डी मार्ट परिसरात खोदकाम करताना आम्हाला हंडा सापडला आहे. त्याच्यामध्ये अर्धा किलो सोने आहे.. कोणालाही न सांगता तुम्ही घेणार असेल तर सांगा.. असे म्हणून सुभाष ननवरे यांना आमिष दाखवले.

कमी पैशांमध्ये सोने मिळेल यापेक्षा सुभाष ननवरे भुलले. 28 जानेवारी रोजी सुभाष ननवरे यांना डी मार्ट परिसरात 2 लाख रुपये घेऊन बोलवण्यात आले. त्यांना दागिने अर्धा किलो दागिने असल्याचे सांगून पिशवी देण्यात आली. 2 लाख रुपये घेऊन चोरटे पसार झाले. 30 जानेवारी रोजी सुभाष ननवरे यांनी आपल्या ओळखीच्या सोनार दुकानदाराला दागिने दाखवले. तेव्हा ते दागिने बनावट असल्याचे त्यांना लक्षात आले.

विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल झालेली फिर्याद.. वाचा..

Related Articles

Back to top button