सोलापूर

भाजीवाल्याच्या मुलीचे युपीएससी परीक्षेत यश

Swati Mohan Rathod Solapur UPSC Exam News

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : सोलापुरातील भाजीपाला विक्रेते मोहन राठोड यांच्या मुलीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 492 रँक मिळवून यश मिळविले आहे. स्वाती मोहन राठोड असे युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तरुणीचे पूर्ण नाव आहे. पाचव्या प्रयत्नात स्वातीला हे यश मिळाले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

विजापूर रोड आदित्य नगर परिसरातील सिटीजन पार्क येथे मोहन राठोड आणि कुटूंबीय राहायला आहेत. मोहन राठोड आणि त्यांची पत्नी विजापूर रोड परिसरात भाजी विकतात. गरीब परिस्थितीतून पुढे आलेल्या स्वातीने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवल्याने राठोड कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्वातीचे दहावीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले. अकरावी आणि बारावीचे शिक्षण तिने सोलापुरातील भारती विद्यापीठात घेतले. त्यानंतर जुळे सोलापुरातील वसुंधरा महाविद्यालयात बीए केले. वालचंद महाविद्यालयात भुगोल विषयात एमए केले आहे.

स्वातीने यापूर्वी चार वेळा युपीएससी परीक्षा दिली आहे. पाचव्या प्रयत्नात तिला हे यश मिळाले आहे. मंगळवारी सायंकाळी युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. स्वातीचे वडील मोहन राठोड आणि त्यांच्या पत्नी भाजीपाला विक्रेते आहेत. स्वातीला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे.

Related Articles

Back to top button