सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन

‘पु.ना.गाडगीळ आणि सन्स’चे डफरीन चौकात स्थलांतर!

On: September 14, 2024 7:08 AM
Follow Us:
HTML img Tag Simply Easy Learning

P N Gadgil And Sons Solapur Showroom Opening News

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : ग्राहकांशी विश्वासाचे नाते व उत्तम सेवा यामुळे सोलापुरकरांच्या मनात स्थान मिळविलेल्या ‘पु.ना.गाडगीळ आणि सन्स’च्या राज्यातील 30 व्या व शहरातील सर्वात भव्य सुवर्ण दालनाचे स्थलांतर सोलापूरच्या डफरीन चौकात येत्या रविवारी दि.१५ सप्टेंबर २०२४ रोजी होत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

पु.ना.गाडगीळ आणि सन्स चे सोलापुरातील सुवर्णदालन सुमारे पंधरा हजार चौरस फुटांचे आहे. त्यात लेटेस्ट व हेरिटेज कलेक्शन पाहावयास मिळणार आहे. या दालनामध्ये येत्या दसरा, दिवाळी आणि लग्नसराईसाठी दागिन्यांची मोठी विविधता सर्वाना बघायला मिळणार आहे. त्यामध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार कस्टमाईज्ड ज्वेलरीदेखील तयार करून देण्यात येईल. या दालनाच्या उद्घाटनानिमित्त १५ सप्टेंबरच्या दिवशी ग्राहकांना दागिने खरेदीसाठी आकर्षक ऑफर दिली आहे. त्यात सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट २० टक्के सवलत तर हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. आणि गार्गी सिल्व्हर फॅशन ज्वेलरीच्या खरेदीवर फ्लॅट २५% सवलत ग्राहकांना प्राप्त होणार आहे.

सोलापुरातील, डफरीन चौकात स्थलांतरित होणाऱ्या सुवर्णदालनात एकाच छताखाली सुवर्ण व्यवसायाशी संबंधित सर्व प्रकारच्या पारंपरिक दागिन्यांव्यतिरिक्त आधुनिक युगातील युवक-युवतींच्या पसंतीचे, कमी वजनाचे, योग्य किमतीचे सोने, चांदी, हिरे आणि गार्गी च्या सिल्व्हर फॅशन ज्वेलरीच्या खरेदीची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe Youtube Channel

Join Now