राजकीय

शरद पवार गटाची स्टार प्रचारकांची यादी जाहीर; 40 मोठ्या नेत्यांचा समावेश

मुंबई: राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्ष प्रचारात व्यस्त आहे. जवळपास आता सगळ्याच जागांवर उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. भाजपा, अजित पवार गट, शिंदे गट आणि ठाकरे गटाने स्टार प्रचारकांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. शरद पवार गटानेही आता 40 स्टार प्रचारकांची यादी घोषित केली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

या यादीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, रोहित पवार, सोनिया दुहान, पूजा मोरे यांच्यासह 40 नेत्यांचा समावेश आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

आतापर्यंत पाच उमेदवारांची घोषणा –
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, अहमदनगरमधून निलेश लंके, वर्ध्यातून अमर काळे आणि दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच माढा आणि सातारा लोकसभेचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नाहीत.


या बड्या नेत्यांना यादीत स्थान
1 – शरद पवार
२- सुप्रिया सुळे
3 – पी.सी.चाको
4- जयंत पाटील
५ – फौजिया खान
6 – अमोल कोल्हे
7- अनिल देशमुख
8- एकनाथ खडसे
9- जितेंद्र आव्हाड
10- वंदना चौहान
11- धीरज शर्मा
12- सिराज मेहंदी
13- शब्बीर विद्रोही
14- सोनिया दुहान
15 – राजेश टोपे
16- यशवंत गोसावी
17 – बाळासाहेब पाटील
18- रोहित पवार
19 – पार्थ पोळके
20 – जयदेव गायकवाड
21- अशोक पवार
22- शशिकांत शिंदे
23 – अरुण लाड
24 – प्राजक्ता तनपुरे
25- सुनील भुसारा
26- नसीम सिद्दीकी
27- विकास लवांडे
28 – रोहित आर. पाटील
29- राजू आवळे
30 – रोहिणी खडसे
31- मेहबूब शेख
32- प्रकाश गजभिये
33 – रवी वर्पे
34 – पंडित कांबळे
35- नरेंद्र वर्मा
36 – राज राजापूरकर
37 – संजय काळबांडे
38- जावेद हबीब
39 – कुमारी सक्षणा सलगर
40 – कुमारी पूजा मोरे

Related Articles

Back to top button