सोलापूर

लक्ष वेधून घेतोय सोलापूरचा रामलल्ला!

Shivam Ranjeet Das Shelke Ram Photography Aayodhya News

HTML img Tag Simply Easy Learning

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर (परशुराम कोकणे) : येत्या 22 जानेवारी 2024 रोजी आयोध्येतील सुंदर अशा मंदिरात श्री रामांची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

संपूर्ण देश या दिवसाची आतुरतेने वाट पहात आहेत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याची उत्सुकता लागली आहे. सगळीकडे राम आणि फक्त राम याची चर्चा होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील बँक अधिकारी, छायाचित्रकार रणजीत दास शेळके यांनी आपले चिरंजीव शिवम याची रामलल्लाच्या वेषात विविध छायाचित्र टीपली आहेत. ही छायाचित्रे टिपण्यासाठी रणजीत शेळके यांनी माचनूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर निवडला होता.

यापूर्वी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या निमित्ताने शिवलिंगाचे पूजन करताना शिवमची टिपलेली छायाचित्रे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.

शिवम हा मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते दास शेळके यांचा नातू आहे.

प्रभू श्री रामांच्या चरणी आमची सेवा अर्पण..

आयोध्या मध्ये सुरू असलेल्या सर्व गोष्टी पाहून शिवमला रामाबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता लागली. आजी, आजोबांकडून रामांच्या विविध गोष्टी तो ऐकू लागला. विविध माध्यमातून श्री रामाबद्दल माहिती जाणून घेतली. एक बाणी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम असे प्रभू श्रीराम शिवमला खूपच आवडले. शिवमचा उत्साह पाहून त्याचे प्रभू श्रीरामाच्या वेशातील फोटो काढायचे आम्ही ठरवले. हीच प्रभू श्री रामांच्या चरणी आमची सेवा अर्पण.
– रणजीत दास शेळके
छायाचित्रकार

कुटुंबीयांसोबत शिवम..

Related Articles

Back to top button