गुन्हे वृत्त

आयुक्त डॉ. पंकज जावळे अडकले!

Ahmadnagar Municipality Commissioner Dr Pankaj Jawale ACB News

HTML img Tag Simply Easy Learning

अहमदनगर / सोलापूर : अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत विरोधी विभागाने मोठी कारवाई केली आहे. डॉ. जावळे यांचे राहते घर सील केलं आहे. अँटी करप्शनचे पथक आता सोलापुरातील डॉ. पंकज जावळे यांच्या घरी येण्याची शक्यता आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

डॉ. जावळे यांनी स्वीय साहाय्यक शेखर देशपांडे याच्यामार्फत त्यांनी लाचेची मागणी केली होती. एसीबी पथकाच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्तसह त्यांचा स्वीय साहाय्यक फरार झाले आहे. जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीने महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचे महानगरपालिकेतील कार्यालय आणि राहते शासकीय घर सील केलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे आणि त्यांचे स्वयं सचिव श्रीधर देशपांडे यांनी बांधकाम व्यवसायिक यांच्याकडे नऊ लाख तीस हजार रुपयाची मागणी केली होती तडजोडीनंतर हे प्रकरण आठ लाख रुपयांमध्ये मिटवण्याचा ठरलं होते त्यानंतर तक्रार यांनी जालना कार्यालयात 19 जून 24 रोजी तक्रार अर्ज दिला होता. या प्रकरणांमध्ये 19 जून आणि 20 जून रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली आहे. संभाजीनगर येथील एसीबी कार्यालय आणि जालना येथील एसीबीने संयुक्त कारवाई केली आहे याप्रकरणी अहमदनगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूआहे. मात्र पंकज जावळे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर फटाके फोडून आनंद साजरा केला आहे.

बांधकाम परवानगी देण्यासाठी अहमदनगर पालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी 8 लाखांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एका कन्स्ट्रक्शन फर्मच्या बांधकामासाठी हा परवाना पाहिजे होता. याच प्रकरणात 19 आणि 20 जून रोजी ही लाच मागितली होती.

लिपिक शेखर देशपांडेच्या बुऱ्हाण नगरमधील घरावर एसीबीकडून छापा टाकण्यात आला आहे. तर आयुक्ताचं राहतं घर लाचलुचपत विभागानं सील केलं आहे.

जनतेचा पैसे लुबाडणारा अखेर जेरबंद – सुहास कदम

सोलापूर महानगरपालिकेमध्ये साहाय्यक आयुक्त असताना पंकज जावळे यांना मी म्हणालो होतो. आज उद्या फेडावे लागते आणि शिक्षा झाली. सोलापूर महानगरपालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त असताना देखील भ्रष्ट कारभार होता. त्यानंतर करमाळा या ठिकाणी बदली झाल्यानंतर देखील मुख्याधिकारी असताना भ्रष्ट कारभार जोमाने सुरू होता.

शेवटी कुठे ना कुठे अंत होतोच तो आज अहिल्यादेवी नगर (अहमदनगर) जिल्ह्याचे महानगरपालिका आयुक्त पदावर असताना 8 लाखाची लाच मागितली. स्वतःचे राहते घर देखील सील करण्यात आले.असो कितीही मोठा अधिकारी असो, अति करत असेल तर त्याची माती झालीच पाहिजे.
– सुहास विजय कदम
अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर शहर जिल्हा

Related Articles

Back to top button