धुक्यात हरवलेल्या रतनगडावर स्वर्गीय अनुभूती!
eco friendly club ratangad sandhan valley trek
काजवा महात्सव, भंडारदरा, सांदण दरी आणि रतनगड भटकंती
इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम
सोलापूर : निसर्ग पर्यटन वाढावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या इको फ्रेंडली क्लबच्यावतीने सह्याद्रीचे दुर्गरत्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रतनगडावर ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले होते. धुक्यात हरवलेल्या रतनगडावर भटकंती करून सर्वांनी स्वर्गीय अनुभूती घेतली. सोबतच निसर्गरम्य अशा भंडारदरा जलाशय (Bhandardara Dam) आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची खोल दरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांदण दरीत (Sandhan Valley) भटकंती करण्यात आली. या उपक्रमात सोलापूर, पुणे येथील 130 हून अधिक निसर्गप्रेमी सहभागी झाले होते.
शुक्रवार दि. 7 जून 2024 रोजी सोलापूर येथील निसर्गप्रेमी चडचणकर ट्रॅव्हल्सच्या (Chadchankar Travels Solapur) 2 लक्झरी बसमधुन अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदारा जलाशयाच्या दिशेने रवाना झाले. 8 जून रोजी पहाटे सर्वजण अकोले तालुक्यातील साई लॉन (Sai Lawn Akole) या ठिकाणी पोचले. याच ठिकाणी पुणे येथून दोन बसमधून ट्रेकर्स दाखल झाले.
फ्रेश झाल्यानंतर वार्मअप करण्यात आला. त्यांनतर चहा – नाश्ता केला. आणि मग भंडारदराच्या दिशेने पुढील प्रवास सुरु झाला.
उंचचउंच शिखरे आणि भंडारदरा जलाशयाचे विस्तीर्ण रूप पाहात सर्व निसर्गप्रेमी घाटघर येथील कोकणकडा परिसरात पोचले. सर्वांनी काही वेळ घाटघर भंडारदरा जलाशयाच्या पाण्यात उतरून आनंद लुटला. डोंगराची काळी मैना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवंद आणि जांभळाचा रानमेवा खाऊन सर्वांनी आनंद घेतला.
त्यानंतर सर्वजण साम्रद गावात दाखल झाले. दुपारच्या जेवणानंतर सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज की जय…, भारत माता की जय.. या घोषणा देत आशिया खंडातील दोन नंबरच्या सांदण दरीत ट्रेकिंगसाठी मार्गस्थ झाले. छोट्या-मोठ्या दगडांवरून तसेच थंडगार पाण्यातून वाट काढत निसर्गाचा अद्भुत चमत्कार असलेली सांदण दरी सर्वांनी पाहिली. जमिनीला पडलेली मोठी भेग म्हणजेच सांदण दरी पाहून सर्वजण भारावून गेले.
सायंकाळच्या सुमारास सूर्यास्त पाहण्यासाठी सर्व ट्रेकर्स सांदण दरीच्या वरच्या बाजूला पोचले. सूर्यास्तानंतर सर्वजण मुक्कामासाठी साम्रद गावाकडे रवाना झाले.
साम्रद गावातील गाईड अतुल आणि राहुल बांडे यांच्याकडे मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. गावरान जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर सर्वजण काजव्यांच्या निरीक्षणासाठी रवाना झाले. वन विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत सर्वांनी निसर्गाचा चमत्कार अनुभवला. रात्री टेन्टमध्ये आणि घरामध्ये मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती.
9 जून 2024 रोजी पहाटे जोरदार पाऊस सुरू झाल्याने सर्वजण वेळ आधीच उठून तयार झाले. चहा – नाश्तानंतर रतनगड ट्रेकिंगसाठी रवाना झाले. पुणे आणि सोलापुरातून आलेल्या निसर्गप्रेमींना सर्व सूचना देऊन साम्रद गावातून ट्रेकिंगला उत्साहात सुरुवात झाली.
थंडगार वारा, बारीक पडणारा पाऊस, धुके याचा आनंद घेऊन सर्वजण रतनगड किल्ल्यावर पोचले. हजारांच्या संख्येने दिसणारे लाल खेकडे पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. या ट्रेक दरम्यान अनेकांनी स्वतःची शारीरिक क्षमता तपासून पाहिली. रानमेव्याचा आस्वादही घेतला.
सह्याद्रीतल्या खडतर वाटेवरून प्रवास करत 4250 फूट उंचीवर असणाऱ्या रतनगडावर पोचून अनेकांना गहिवरून आले. सोबत आणलेल्या डब्यातील जेवणावर सर्वांनी मस्त ताव मारला. त्यानंतर रतनगडाचे नेढेही पाहिले. धुक्यात हरवलेले रतनगड जणू स्वर्गच भासत होते.
किल्ला भटकंतीनंतर रतनवाडी गावाच्या दिशेने उतरायला सुरुवात केली. या भटकंतीवेळी स्थानिक गाईड राहुल बांडे यांचे सहकार्य महत्वाचे ठरले.
खाली उतरल्यानंतर रतनवाडी गावातील प्राचीन श्री अमृतेश्वर मंदिराला सर्वांनी भेट दिली. त्यानंतर सर्वांचा परतीचा प्रवास सुरु झाला.
अकोले येथील साई लॉनवर संतोष नवले, तुषार नवले आणि त्यांच्या टीमने रात्रीच्या जेवणाची छान व्यवस्था केली होती. निसर्गरम्य अशा अकोले तालुक्यात पुन्हा येवू असा शब्द देवून सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले.
इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, समन्वयक सटवाजी उर्फ अजित कोकणे, पुणे विभागाचे समन्वयक महेंद्र राजे, संतोषकुमार तडवळ यांनी भटकंतीचे नेतृत्व केले.
रतनगड, सांदण दरी आणि भंडारदरा परिसरातील भटकंतीमध्ये सोलापूर येथून सरस्वती कोकणे, प्रेमा कुंभार, डॉ. शुभांगी कनकी , संजीव मोरे, रविकांत सुरवसे, आप्पासाहेब चव्हाण, महेश ढवण, रोमा ढवण, रुपाली ढवण, ध्रुव मुळे, आर्य मुळे, सोहम येमुल, सोनाली शाम येमुल, मिनाक्षी श्रीनिवास श्रीराम, हरणी श्रीनिवास श्रीराम, शिवली श्रीनिवास श्रीराम, विनोद प्रकाश कनकी, शोभा कनकी, महेश सूर्यकांत माने, रुपेश उडता, पवन जितेश पवार, विजयकुमार दिलीप टेकाळे, गौरीशंकर बनसिद्ध नारायणे, अरुंधती जित्री, रोहिणी जगताप, जयसिंग जगताप, सुदीक्षा जगताप, गौरवी जयसिंग जगताप, डॉ. प्रविण ननवरे, श्रीनिवास ननवरे, डॉ. मंजुषा ननवरे, गणेश पांडुरंग चाबुकस्वार, योगिता गणेश चाबुकस्वार, अस्मी गणेश चाबुकस्वार, श्रीधर मारुती चव्हाण, स्वाती श्रीधर चव्हाण, राजश्री सुतार, दीपक श्रीकांत लोहार, अपूर्वा कुलकर्णी, व्यंकटेश अरविंद कुलकर्णी, आरव कनकी, अंतरीक्ष जित्री, प्रज्ञेश श्रीधर चव्हाण, अथी गणेश चाबुकस्वार, पूजा कोकणे, गंगुबाई कोकणे, सई धुमाळ, आर्यन पवार, निर्मला धुमाळ, प्राची पवार, ज्योती अरविंद गायकवाड, सचिन कांबळे, स्मिता कुंभार, सृष्टी विनोद कुंभार, नंदिनी उमेश माने, स्मिता मगदूम, गौरी धुमाळ, सीमा धुमाळ, श्रद्धा संदीप पाटील, परिचिता शहा, डॉ. सुमेधा कंदलगावकर, अपूर्वा देवदास कुलकर्णी, यश पवार, आर्यन होटकर, कृष्णा काशीद, शुभम काडगावकर, पियुष कटके, समर्थ जाधव, मंगेश माने, गौरी माने, गायकवाड शशिकला, विद्या महेंद्र अक्कलकोटे, तनया महेंद्र अक्कलकोटे, अमिता शरद चव्हाण, सलोनी चिपडे, संगमनाथ नागोजी, सार्थक खानापुरे, स्वरा उपाध्ये, काजल माने, कलादगी इम्तियाज बाशा, केदार दत्तात्रय जोशी, ऋतुजा केदार जोशी, अनिश देशमुख, सार्थक धुमाळ, परम मगदूम, कुशाग्र वागज, स्वरीत शहा, अमित अन्नाराव खुटाळे, अपूर्व अमित खुटाळे तसेच
पुणे येथून समन्वयक महेंद्र राजे, अंकिता हवगोळ-राजे, वैष्णवी राजे, हर्षल हवगोळ, रुषिकेश तारापुरे, प्रशांत तारापुरे, कुमुद शिंदे, शुभांगी चंदनशिवे, स्मिता गायकवाड, शंतनू देव, अश्विनी देव, अर्जुन देव, मृणाल कुलकर्णी, स्नेहल योगेश साळुंखे, क्षितिज योगेश साळुंखे, जयश्री दशरथ लोकरे, दशरथ लोकरे, सृष्टी राऊत, शीतल राऊत, वेदांत महाजन, अरुण कालेकर, अवनी भरले, सारीका भरले, गिरिजा राजेश मगर, गिरीश राजेश मगर, राजेश मधुकर मगर, सौ.कल्पना निवृत्ती शिंदे, राजेश्वरी समीर शिंदे, समीर निवृत्ती शिंदे, श्री.निवृत्ती तुळशीराम शिंदे, हितेन उपासनी, आशिष तुळशीराम शिंदे, सुवर्णा आशिष शिंदे, कल्याण महादेव जगताप, विजयालक्ष्मी नागेश खेडकर, दिपाली शिंदे, अमित शिंदे, श्रीतेज शिंदे, मीरा शिंदेन यांचा सहभाग होता.
रतनगड, सांदण दरी आणि भंडारदरा परिसरातील भटकंती अधिक आनंददायी होण्यासाठी, सह्याद्रीतल्या घाट वाटांमधून प्रवास करण्यासाठी चडचणकर ट्रॅव्हल्सचे संचालक मृगेंद्र चडचणकर, सोमनाथ चडचणकर, जगदीश चडचणकर, चालक समीर मस्के, श्री. कटारे, श्री जमादार, अतिष तांबे, अजय यांचे सहकार्य लाभले. पुणे येथील अतुल दाभाडे यांचे सहकारी मिळाले.
पुढील भटकंती – आडराई जंगल ट्रेक, नागेश्वर मंदिर, नाणेघाट, लेण्याद्री – WhatsApp Group Link (Click on below image)