अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात
सोलापूर : आयुष्यात शिक्षणाबरोबरच खेळही महत्त्वाचे असून त्याने मन व शरीर ही सक्षम होते. खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, निर्णयक्षमता, सहानुभूती, शिस्त, सहकार्याची भावना वाढीस लागते, असे मोलाचे मार्गदर्शन प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना केले निमित्त होते अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूल मधील क्रीडा महोत्सवाच्या समारोपाचे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जोडभावी पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर राजेंद्र करणकोट व चव्हाण उद्योग समूहाचे डायरेक्टर घनश्याम चव्हाण हे लाभले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री अजय पोन्नम उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजा व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. सौ अर्चना महांकाळ यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री. अजय पोन्नम व चन्नेश इंडी यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
यानंतर विद्यार्थ्यांकडून शिस्तबद्ध संचलन करण्यात आले. क्रीडा महोत्सवात क्रिकेट, रनिंग, रिले, थ्रो बॉल ,नेटबॉल, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कबड्डी या खेळांचा समावेश होता. सर्व स्पर्धा या हाऊस प्रमाणे घेण्यात आल्या होत्या. सर्वच खेळ अत्यंत चुरशीचे झाले. विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य पणाला लावून खेळ सादर केले. यंदा सर्व खेळ प्रकारात ब्लू हाऊस ने बाजी मारत बेस्ट हाऊसचा किताब पटकावला .यशस्वी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फौजान अझहारी यांनी केले तर आभार प्रदर्शन अंबिका बडदाळ यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री .अजय पोन्नम, संचालिका सुलक्षणा पोन्नम, चन्नेश इंडी, पर्यवेक्षिका तस्नीम शेख, सौ. शितल रजपूत सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.