गुन्हे वृत्त

दुःखद : कॉलेजला निघालेल्या भाग्यश्रीचा अपघाती मृत्यू

सोलापूर : कोंडी येथून सोलापूर येणाऱ्या रिक्षाला (एमएच १३, सीटी ९४७९) सोलापूर विद्यापीठासमोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे चाललेल्या कारने जोरदार धडक दिली. या घटनेत कॉलेजला निघालेल्या अकरावीतील भाग्यश्रीचा मृत्यू झाला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

ही धडक इतकी जोरात होती की रिक्षामध्ये बसलेली भाग्यश्री कांबळे ही विद्यार्थिनी रिक्षातून फेकली गेली. मुख्य रस्त्यावर असलेल्या रिक्षातून फेकली गेलेली भाग्यश्री सर्विस रस्त्यावर आपटली. यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. त्याचबरोबर रिक्षात तिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी (वय १९) ही या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. तिच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याचबरोबर या अपघातात रिक्षात असलेला आदित्य सुनील भोसले (वय १४) हा आठवी शिकणारा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी सोलापूर शहरातील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ऐश्वर्या सोडगी हिच्यावर अश्विनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning

अपघाताची माहिती मिळताच कोंडी येथील तरुणांनी जखमींना सोलापूर शहरातील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच भाग्यश्रीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

कोंडीत हळहळ

भाग्यश्री कांबळे ही शहरातील गांधीनाथा कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. वडील निवृत्ती कांबळे हे शासकीय सेवेत चतुर्थश्रेणी कर्मचारी असून भाग्यश्रीला एक बहीण आहे. भाग्यश्रीच्या अपघाती मृत्यूमुळे कोंडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Back to top button